Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्र्यांची लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, सहाव्या हफ्त्याबाबत दिली महत्वाची अपडेट

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सहाव्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी बातमी दिली आहे. सहाव्या हफ्त्याचे पैसे मिळाल्यानंतर या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना एकूण ९००० रुपये मिळतील

Priya More

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना सहाव्या हफ्त्याचे पैसे कधी येणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आठवडाभरामध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हफ्त्याचे पैसे मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींचा या वर्षाचा शेवट गोड होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ⁠'पुढील सात ते आठ दिवसांत लाडक्या बहीणीचे पैसे दिले जातील. डिसेंबरचा हप्ता आठवडाभरात देऊ.' त्यामुळे आता लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर ३१ डिसेंबरच्या आतच सहाव्या हफ्त्याचे पैसे जमा होणार आहे. सहाव्या हफ्त्याचे पैसे मिळाल्यानंतर या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना एकूण ९००० रुपये मिळतील.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. राज्यामध्ये लाडकी बहीण योजना १ जुलैपासून लागू झाली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत लाडक्या बहिणींना पाच हफ्त्याचे पैसे मिळाले आहेत. आतापर्यंत लाडक्या बहिणींना ७,५०० रुपये मिळाले आहेत. आता ते सहाव्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. आता हे पैसे येत्या ७ दिवसांत मिळतील.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पानंतर लाभार्थी महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये दरमहा मिळू शकतात. महायुतीचे सरकार आले आहे. पण आता २१०० रुपये कधी मिळणार याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरण, साक्षीदाराच्या भावाला धमकी

'तटकरेंना आमचा विरोध', शिंदेंसेनेच्या आमदाराच्या मुलीनं भरला उमेदवारी अर्ज, कोकणात युतीला तडा

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT