e-KYC Saam tv
महाराष्ट्र

लाडकींना मोठा दिलासा, e-KYC बाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, महिन्याला १५०० रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा?

e-KYC ladki bahin yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. e-KYC बाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. वाचा संपूर्ण अपडेट

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

राज्य सरकारने सरकारला दिला मोठा दिलासा

आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. योजनेची ई-केवायसी करताना चूक केलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता राज्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही लाभार्थी महिलांना मिळणे बंद झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून काही महिलांना महिन्याचे १५०० रुपये मिळणे बंद झाले आहेत. कारण सरकारने लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती. सरकारने दिलेली मुदत संपली आहे. तर काहींनी ई-केवायसी करताना चूक केली. त्यामुळे त्या महिलांना लाभ मिळेना झाला आहे. काही महिला योजनेचे पैसे मिळत नसल्याने वारंवार बँकेत फेऱ्या मारत आहेत. काही महिलांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. या महिलांसाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.

लाडकी बहीण योजनेतील बोगस नावे यादीतून काढण्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया बंधनकारक केली होती. सरकारने महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी केल्याचा दावा आहे. त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीच्या योजनेचे लाभ मिळणे बंद झाले आहेत.

मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केलं आहे की, आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येतेय. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आलीये. यामुळे योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात'. तत्पूर्वी, प्रत्यक्ष पडताळणी झाल्यानंतर निकषात बसणाऱ्या महिलांना महिन्याचा १५०० रुपये मिळण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

असहाय्य महिलांना ती वेश्याव्यवसायात ढकलायची; टीप मिळाली, हॉटेलवर धाड टाकली; आतील दृश्य बघून सगळेच हादरले

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये मनसेचे नगरसेवक शिंदे गटासोबत गेल्याने ठाकरे गट संतप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! ‘ई-केवायसी’ चुकली तरीही मिळणार लाभ,फक्त करा 'हे' काम?

Crime: धारदार शस्त्रानं आधी पोट फाडलं, नंतर गुप्तांग कापून झाडाला लटकवलं; महिलेने बॉयफ्रेंडला दिला भयानक मृत्यू

'लेडी बॉस'च्या मृत्यूचं गूढ उलगडलं; कर्मचाऱ्यानेच पेट्रोलने टाकून जाळलं अन् रचला अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT