Ladki Bahin Yojana Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : आणखी ४५ हजारांहून अधिक 'लाडक्या बहिणी' अपात्र; ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याची अपडेट समोर

Ladki Bahin Yojana e-KYC Update : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी आणि निकषांच्या पडताळणीत अमरावती जिल्ह्यातील ४५ हजार ४४९ महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यापैकी २२ हजार २९९ महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

अमर गटारे, अमरावती प्रतिनिधी

Ladki Bahin October Installment Date : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत अमरावती जिल्ह्यात मोठी घट झाली आहे. शासनाने सुरू केलेल्या ई-केवायसी (e-KYC) आणि विविध निकषांच्या कठोर पडताळणीत जिल्ह्यातील तब्बल ४५ हजार ४४९ महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. यामध्ये २२ हजारांहून अधिक महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद झाल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात ६ लाख ९५ हजार ३५० महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र, अर्जांची छाननी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर खालील निकषांवर बोट ठेवत प्रशासनाने कारवाई केली आहे. पडताळणीत २२ हजार २९९ महिला अपात्र आढळल्याने त्यांचा आर्थिक लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.

चारचाकी वाहनधारक असणे, वयोमर्यादेची अट न पाळणे, एकाच कुटुंबातील मर्यादेपेक्षा जास्त लाभार्थी असणे तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याने उर्वरित महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. एकीकडे केवळ खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही छाननी आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे, तर दुसरीकडे अचानक आर्थिक आधार बंद झाल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत अपडेट

दरम्यान, पात्र ठरलेल्या महिलांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या एकत्रित हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा निधी (प्रत्येकी १,५०० रुपयांप्रमाणे एकत्रित ३,००० रुपये) लवकरच जमा केला जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजतेय. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे १५०० जमा झाले आहेत. पण अद्याप ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचेही कोणतेही अपडेट नही. दरम्यान, ज्या महिलांचे बँक खाते आधारशी संलग्न (DBT सक्रिय) आहे आणि ज्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, त्यांनाच या हप्त्याचा लाभ मिळणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : उरुळी कांचन येथे डंपरने दुचाकीला चिरडले ; महिलेचा जागीच मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज

Maharashtra Weather Update: धुळे @11°...!विदर्भ, उत्तर महाराष्ट्र गारठला; राज्यात आज कसं असेल हवामान, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान

Delimitation Bill : ज्ञानेश कुमार यांच्याकडे जाणार मतदारसंघ पुनर्रचनेची सूत्रं? नव्या विधेयकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

BJP MP : भाजप खासदाराच्या कारला भीषण अपघात; हात फ्रॅक्चर, गाडीत होते ४ जण, नेमकं काय घडलं?

Saturday Horoscope : रखडलेली कामं मार्गी लागतील! 5 राशींच्या आयुष्यात पुन्हा मोठा बदल होणार; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT