Mukyamantri Ladki Bahin Yojana Saam Digital
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' गुदमरली, नंदुरबारमध्ये बँकेत महिलांची चेंगराचेंगरी, दोन महिला बेशुद्ध

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : नंदुरबारच्या धडगावात स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलीये. लाडकी बहिण योजनेसाठी ई-केवायसीसाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. या चेंगराचेंगरीत 2 महिला पडल्या बेशुद्ध पडल्या होत्या.

Girish Nikam

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

नंदुरबारच्या धडगावात स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलीये. लाडकी बहिण योजनेसाठी ई-केवायसीसाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. या चेंगराचेंगरीत 2 महिला पडल्या बेशुद्ध पडल्या होत्या. नियोजना अभावीचं ही घटना घडल्याचा आरोप होतोय. पाहूया एक रिपोर्ट....

महायुती सरकारच्या लाडकी बहिण योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळतो आहे. लाभार्थी महिलेंच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यावर आता पैसे काढण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. नंदुरबारच्या धडगावातही स्टेट बँकेत ई-केवायसीसाठी सकाळपासून गर्दी झाली होती. दोन किमीपर्यंत महिलांची रांग गेली होती. मात्र हीच गर्दी जीवावर बेतली असती. कारण तुम्ही दृश्य बघा....छोट्या जागेत किती मोठ्या प्रमाणात महिलांची झुंबड उडाली आहे.

याच गर्दीचं रुपांतर चेंगराचेंगरीत झालं. या घटनेत 2 महिला बेशुद्ध पडल्या...दोन्ही महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दुसरीकडे महिला आणि पुरुषांची वेगळी रांग नसल्यानं अनेक महिलांची छेड काढण्याचेही प्रकार घडल्याचा आरोप होतोय. साम टीव्हीशी संवाद साधताना अनेक महिलांनी आपली व्यथा मांडली.

खरंतर अशी गर्दी होणार असं अपेक्षित असताना बँकांकडून मनुष्यबळाचं कुठंलच नियोजन केलं जात नाही. नंदुरबारसारखे कमी-जास्त प्रकार राज्यात अनेक बँकामध्ये होत आहेत. मात्र बँक प्रशासन उदासिन असल्याचं चित्र आहे. दरम्यान अपुऱ्या व्यवस्थेवरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

लाडकी बहिण योजनेवरुन राज्यात कुठे चेंगराचेंगरी होतेय... कुठे ग्राहक सेवा केंद्र बहिणींची लूट करतेय तर कुठे बँका लाभार्थ्यांच्या कर्जांचे हफ्ते परस्पर वळते करुन घेतायेत. त्यामुळे लाडक्या बहिणी पुरत्या हतबल झाल्यात. सरकार मात्र केवळ कारवाईचा ईशारा देण्यात धन्यता मानतेय. लाडकी बहिण योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता बँका, पोस्ट यांनी गर्दीचं अचूक व्यवस्थापन करुन सजग राहणं गरजेचं आहे. धडगाव सारख्या घटना टाळण्यासाठी सरकारनेही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT