The Maharashtra government is under fire after 42 lakh women under the Ladki Bahin Yojana were declared ineligible, leading to a ₹6,800 crore recovery drive. Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र,अपात्र लाभार्थ्यांकडून 6800 कोटींची वसुली होणार?

Ladki Yojana Under Scrutiny: तब्बल 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेत. त्यामुळे कोट्यवधींचा घोटाळा लाडकी बहीण योजनेत झालाय. आता सरकार लाडकीवर काय कारवाई करणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर अनेक त्रुटी समोर येतातय. त्यातच आता पडताळणीनंतर तब्बल 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अपात्र अर्जदाराच्या स्वयंघोषणापत्राचा आधार घेऊन त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

लाडकीचे 6,800 कोटी वसूल करणार?

राज्य सरकरच्या पडताळणीनंतर 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र

अपात्र लाभार्थींना 11 महिन्यांत 6800 कोटींचा लाभ

स्वयंघोषणापत्राच्या आधारे कारवाई होण्याची शक्यता

अपात्र लाडकींकडून 16,500 लाभाची वसुली करणार?

दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य फायदा घेणाऱ्या सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार आता या कारवाई केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

सरकारी लाडक्यांकडून वसुली करणार

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई

9526 लाडकींची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडे नावं आणि त्यांच्या विभागांनिशी तयार

10 महिन्यांत साडेचौदा कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीनं कमावले

लाटलेल्या रकमेची वसुली होणार, सरकारचा आदेश

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वेतनवाढ रोखण्याची कारवाई करणार?

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारनं घाईघाईत दहा योजना जाहीर केल्या होत्या. त्यातच लाडकी बहीण योजनेत 42 लाख लाभार्थी अपात्र निघाले. त्यामुळे पडताळणी न करता मतांसाठी जाणीवपूर्वक हा लाभ दिला का ? असा सवाल विचारला जातोय. तसचं याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोग की सर्वोच्च न्यायालयात धाव घेता येईल का ? यावर मविआतील नेते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार कोणत्या पद्धतीनं पैसे वसूल करणार? सरकारी कर्मचारी असणाऱ्या लाडकींवर कोणती कारवाई करण्यात येणार? अपात्र लाडकीचे लाभ थांबवल्यानंतर भविष्यात पडताळणीनंतर गरजूंपर्यंत हा लाभ पोहचवला जाईल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT