Ladki Bahin Yojana Saam Digital
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: ...तर त्यांच्याविरोधात तक्रार करा, लाडकी बहीण योजनेबाबतच्या अफवांवर मुनगंटीवार यांचे मोठे वक्तव्य

Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजनांचे पैसे लवकरच त्याच्या खात्यात जमा होणार आहे. ', असे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

Priya More

महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला लाडकी बहीण योजनेचा चांगला फायदा झाला. ही योजना महायुतीसाठी कलाटणी देणारी ठरली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना सहा हप्त्याचे पैसे मिळाले. आता निवडणुका झाल्यानंतर पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी येणार याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना सांगितले की, 'लाडकी बहीण योजनांचे पैसे लवकरच त्याच्या खात्यात जमा होणार आहे. या संदर्भात माझे अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. ही योजना कुठेही बंद पडणार नाही. या विरोधात काँग्रेस पक्ष कुठे चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असतील तर त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करा.'

लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये आणि पात्रामध्ये बदल होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबद्दल बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, 'पात्रता आणि निकषांत बदल होणार नाहीत. अफवा पसरवल्या आहेत. विधानसभेत झटका बसलेले जिल्हा परिषदेत काय होईल याच्या भीतीत आहेत.' असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला आहे.

तसंच, 'नागपूर अधिवेशनात यावर कुणी प्रश्न विचारणार नाही. कुणी विचारलंच तर आम्ही काँग्रेसची भूमिका काय ते विधानसभेच्या व्यासपीठावरून सांगू.', असा इशारा देखील सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला दिला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला खूप चांगला फायदा झाल्या. या योजनेमुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतं दिली. या योजनेला राज्यभरातील महिलांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना २१०० रुपये हफ्ता दिला जाईल असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT