Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकीसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी सरकारचा आणखी एक नियम, पती किंवा वडिलांची माहिती द्यावीच लागेल, वाचा

Ladki Bahin Yojana KYC New Rule: लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसंदर्भात आता आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे. आता लाभार्थी महिलांच्या पती किंवा वडिलांची केवायसी करणे अनिवार्य असणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

केवायसीसंदर्भात नवीन नियम लागू

आता वडील किंवा नवऱ्याची केवायसी अनिवार्य

लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे गरजेचे आहे. दरम्यान, केवायसी न केल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. याचसोबत केवायसीमध्ये जर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे. दरम्यान, आता या योजनेच्या केवायसीसंदर्भात अजून एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता या योजनेत लाभार्थी महिलांसोबतच त्यांच्या वडील किंवा पतीची केवायसीदेखील करावी लागणार आहे.

पती आणि वडिलांचीही केवायसी अनिवार्य (Ladki Bahin Yojana Father or Husband KYC Mandatory)

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अजून घटण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसीमधून अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता महिलांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी केली जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचीही पडताळणी केली जाणार आहे.

२.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ बंद

या योजनेच्या लाभार्थी महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे उत्पन्न किती आणि महिला जर अविवाहित असेल तर वडिलांचे उत्पन्न किती याबाबत माहिती द्यावी लागणार आहे.जर त्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहे. याआधीही पडताळणीत अनेक महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता केवायसीमधून सर्व निकषाबाहेर बसणाऱ्या महिलांना फटका बसणार आहे. त्यांचे लाभ बंद केले जाणार आहे.

केवायसी कधीपर्यंत करावी?

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. तुम्हाला तोपर्यंत केवायसी करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाहीये. लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Local Body Election : ठाकरेंची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती, शिंदेंची शिवसेना एकाकी, रायगडचे राजकारण तापलं

Pune Crime: पुणे हादरलं! १८ वर्षीय प्रेयसीवर चाकूने हल्ला, प्रेमाचा थरारक शेवट

Honeymoon Destinations: लग्नानंतर हनिमूनसाठी महाबळेश्वर, माथेरान कशाला? भारतातली ही खास अन् शांत ठिकाणं ठरतील बेस्ट

Punha Shivajiraje Bhosle Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा हाऊसफुल, वीकेंडला कमाई किती?

SCROLL FOR NEXT