Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २५ दिवस! लाडक्या बहिणींनो हे काम लगेच करा, अन्यथा मिळणार नाहीत ₹१५००

Ladki Bahin Yojana KYC Mandatory for Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

पुढचा हप्त मिळवण्यासाठी केवायसी अनिवार्य

केवायसी न केल्यास मिळणार नाही पैसे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. डिसेंबर महिना सुरु झाला तरीही नोव्हेंबरचाच हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे आता दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आता यापुढचे हप्ते मिळवण्यासाठी लाडक्या बहि‍णींना केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाडक्या बहि‍णींना केवायसी अनिवार्य (Ladki Bahin Yojana KYC Mandatory)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. तुम्हाला त्याआधी केवायसी करायची आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर जानेवारीपासून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायचे आहे.

केवायसी न केल्यास पैसे मिळणार नाही (Ladki Bahin Yojana KYC)

लाडकी बहीण योजनेत केवायसी न केल्यास महिलांना पैसे मिळणार नाहीत. दरम्यान, आता दरवर्षी केवायसी होणार आहे. केवायसीद्वारे लाडकी बहीण योजनेबाबत पारदर्शकता वाढणार आहे. त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसीतून महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. यातून २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. दरम्यान, अजूनही लाखो महिलांचे केवायसी बाकी आहे. या महिलांनी शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नये. त्यांनी लवकरात लवकर केवायसी करावे.

नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार?

लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्त एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु दोन वेगवेगळे हप्ते येणार असल्याचे बोलले जात आहे. एक हप्ता निवडणुकीआधी दिला जाईल, अशी चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Repo Rate: सर्वसामान्यांना दिलासा! रेपो रेटमध्ये मोठी कपात, कर्जाचा हप्ता होणार कमी

Digital Satbara: डिजिटल 7/12 ला अधिकृत मान्यता, सरकारी, बँक आणि न्यायालयीन कामांसाठी ठरेल वैध

Veg Hakka Noodles Recipe: हॉटेलमध्ये मिळणारा व्हेज हाक्का न्यूडल्स घरी कसा बनवायचा?

Shocking : Pune: २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, आईच्या प्रियकराचं भयंकर कृत्य; मालिश करायला सांगायचा अन्...

Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन, प्रसूतीदरम्यान घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT