Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण होऊ शकते मग लाडके कीर्तनकार का नाही? महाराजांनी मंत्री आदिती तटकरेंनाच विचारला प्रश्न

Ladki Bahin Yojana Update: मावळ तालुक्यात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये आदिती तटकरे सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांना महाराजांनी लाडके कीर्तनकार का नाही? प्रश्न विचारला होता.

Priya More

दिलीप कांबळे, मवाळ

'लाडकी बहीण होऊ शकते, मग लाडके कीर्तनकार नाही होऊ शकत का ताई?' असा प्रश्न महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना महाराजांनी विचारला आहे. त्यांच्या या प्रश्नानंतर किर्तन महोत्सवामध्ये एकच हशा पिकला. मावळ तालुक्यात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये आदिती तटकरे सहभागी झाल्या होत्या.

संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात नवीन वर्षाची सुरुवात ही कीर्तन महोत्सवाने करण्यात आली. मावळ तालुक्यातील कामशेत येथे श्री. विठ्ठल परिवार मावळच्या वतीने ५ दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील आणि आजूबाजूंच्या तालुक्यांमधील लाखो भाविक दरवर्षी या कीर्तन महोत्सवामध्ये सहभागी होत असतात.

कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील हजेरी लावली होती. मंत्री आदिती तटकरे यांनी या कीर्तन महोत्सवात सहभागी होत कीर्तन ऐकण्याचा आनंद घेतला. यावेळी कीर्तनकार ह.भ.प जयेश महाराज भाग्यवंत यांनी आदिती तटकरे यांना लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका किर्तनकार योजना होऊ शकते का? असे विचारले तेव्हा कीर्तन महोत्सवाच्या मंडपात एकच हशा पिकला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये हफ्ता दिला जातो. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर सहा हफ्त्याचे जवळपास ९००० रुपये जमा झाले आहेत.

सहाव्या हफ्त्याचे पैसे नुकताच त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. महायुतीचे सरकार आल्यानंतर लाभार्थी महिलांना २१०० रुपये हफ्ता देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती. आता राज्यात महायुतीचे सरकार आले आहे त्यामुळे २१०० रुपये कधी पासून मिळणार याची वाट लाभार्थी महिला बघत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT