ajit pawar Saam Tv News
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा सातवा हप्ता खात्यात कधी जमा होणार? अजित पवारांनी तारीखच सांगून टाकली

Ajit Pawar on ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? या प्रश्नावर त्यांनी तारीखचं सांगून टाकली.

Bhagyashree Kamble

लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली. विधानसभा निवडणुकीच्या यशामागे लाडकी बहि‍णींचा मोठा वाटा आहे, असं म्हणत महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या विजयाचं श्रेय त्यांना दिलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहि‍णी डिसेंबरच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत होत्या. डिसेंबरचा हप्ता महिनाअखेरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता जानेवारीच्या हप्त्याची लाभार्थी महिला वाट बघत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनच्या जानेवारी हप्त्याबाबात मोठी अपडेट दिली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? याबाबात प्रश्न विचारले असता, अजित पवार यांनी मोठी माहिती दिली आहे. २६ तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा होतील, असं अजित पवार म्हणालेत.

तसेच उद्यापासून विविध विभागांना भेटून बैठका घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदाचा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्त लावणारा असणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आपली जबाबदारी वाढली आहे. महायुतीला लोकसभेला कमी जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता वेगळं चित्र आहे. विधानसभेला आपल्याला चांगलं यश मिळाले. कोणतेही यश अपयश कायम नसतं. आपल्याला यात सातत्य ठिकवायचंय, असेही अजित पवार म्हणाले.

चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी

सध्या पक्षात अनेकजण येत आहेत. पक्षाची बेरीज झाली पाहिजे. कमीपणा यायला नको. जनमानसात प्रतिमा खराब असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान नकोच. गैरवर्तणूक होता कामा नये. अशा सूचनाही अजित पवार केल्या. चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT