Ladki Bahin Yojana SAAM TV
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: चारचाकीवाल्या लाडकीचा हप्ता बंद; अंगणवाडी सेविका लाडकींची चौकशी करणार

Ladki Bahin Yojana Application Checking: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आणि अर्जांची फेरतपासणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत लाडक्या बहिणींची सत्यता तपासण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेजल नागरे, साम प्रतिनिधी

लाडकी बहिण योजनेच्या निकषांच्या आधारावर लाडकींचे अर्ज पुन्हा तपासले जातायत.गेल्या महिन्यातच फेरपडताळणीत अनेक लाडक्या अपात्र ठरल्यानंतर आता पुढच्या चौकशीसाठी अंगणवाडी सेविका थेट तुमच्या दारी येणार आहेत. पाहुयात याचसंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहिण योजनेत लाखोंच्या संख्येनं नियमबाह्य लाडकींनी घुसखोरी केल्याचं उघड झालंय.

त्यामुळे आता अशा लाडकींचा थेट घरी जाऊन पंचनामा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे आता थेट अंगणवाडी सेविकाच लाडकीच्या घरी धडक देणार आहेत. महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 'लाडक्या बहिणींच्या' घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. ही यादी घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश डॉ. अनुप कुमार यादव यांनी दिले आहेत.

लाडकी बहीणचे निकष काय?

कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं

कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा

चारचाकी गाडी असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील

संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा

लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65 च्या दरम्यान असावं

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पडताळणी न करता लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला होता का ? आणि आता जेव्हा सरकारी तिजोरीवर ताण वाढलाय तेव्हा सरकारला जाग आली का ? असे प्रश्न विरोधकांसह लाडक्याही विचारतायत. तुर्तास आता या चारचाकीच्या चाळणीत किती लाडक्या दोडक्या होणार याकडे सर्वांच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT