Ladli Bahina Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडक्या बहिणींकडून वसूली, कर्मचार्‍यांनी लाटले प्रति महिना ₹१५००; वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana Government Employees Get Benefit: लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचा लाभ बंद करुन त्यांच्यकडून वसूली केली जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती उघडकीस

सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ

सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहे. या निकषाअंतर्गत येणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. योजनेचा निकषाबाहेर जाऊन लाभ घेणे हे सरकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे.

बुलढाण्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ

बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असताना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस होता. शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या १९६ कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. १९६ महिलांनी योजनेचा निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्या प्रकरणाची चौकशी केली असता १९० कर्मचारी हे अर्धवेळ आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळल्याने ते पात्र ठरले आहेत.

दरम्यान, उर्वरित 6 शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची प्रत्येकी १६ हजार ०० असे एकूण ९९ हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आले आहेत.. या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे शासनाची फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या महिलांकडून पैसे वसूल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : ड्राय डेलाही दारू मिळणार? ड्राय डेबद्दल सरकारने निर्णय बदलला?

'अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले उत्तम मुख्यमंत्री'; विधीमंडळात दादांच्या आठवणींना उजाळा

Onion Farmer Protest: 'कांद्याला 1500 रुपये अनुदान द्या'; कांद्याचे दर घसरले, शेतकरी रस्त्यावर

Crime News: आधी गोळी झाडली, नंतर तुकडे करत निळ्या ड्रममध्ये भरला मृतदेह; पोरानं बापाला क्रूरपणे संपवलं

मोठी बातमी! भारतात आणखी एक विमान अपघात, उड्डाण घेतल्यानंतर एअर अ‍ॅम्बुलन्स जमिनीवर कोसळलं

SCROLL FOR NEXT