Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचा हफ्ता पुढच्या आठवड्यात मिळणार; ई-केवायसीला लावला ब्रेक

Maharashtra Government: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा हफ्ता पुढच्या आठवड्यात मिळणार आहे. याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे

  • ऑक्टोबरचा हफ्ता पुढील आठवड्यात मिळणार

  • ई-केवायसी प्रक्रिया देखील तात्पुरती स्थगित करण्यात आली

लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'ची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे.

महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअतंर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचा हफ्ता दिला जातो. या योजनेला २८ जून २०२४ ला मान्यता मिळाली. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२४ च्या मुदतीमध्ये २ कोटी ५६ लाख महिलांनी अर्ज केले. सहा महिन्यांनंतर निकषांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थींची पडताळणी सुरू करण्यात आली.

सरकारकडून या योजनेच्या लाभार्थींची पडताळणी केल्यानंतर राज्यातील जवळपास ४५ लाख महिलांना लाभ मिळालेला नाही. आता ‘ई-केवायसी’तून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा शोध घेतला जाणार आहे. या निकषांनुसार राज्यभरातील ७० लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या निषकांनुसार पात्र असलेल्या महिलांचा लाभ बंद होणार नाही त्यामुळे त्यांना चिंता करण्याची गरज नाही.

अशामध्ये आता सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या योजनेसाठी ई-केवायसी करताना अनेक अडचणींचा सामना लाडक्या बहीणींना करावा लागत आहे. या वेबसाईटवरील ई-केवायसी करण्यातील तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत. पण लाभार्थी महिलांनी ई-केवायसी कधीपर्यंत करायची त्याची मुदत काय हे अद्याप निश्चित झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT