Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचे पैसे थेट भावांच्या खात्यात; मेसेज येताच बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojana : सचिन सीएससी सेंटर चालकाने हा प्रताप केला असून लाडक्या बहि‍णींची फसवणूक करत त्याने लाखोंचा घोटाळा केला आहे.

Ruchika Jadhav

लाडकी बहीण योजना सतत काही ना काही कारणाने चर्चेत असते. योजनेचे पैसे मिळावेत म्हणून अनेकांनी यामध्ये बरीच उलाढाल करत आपला नंबर लावला आहे. अशात आता नांदेडमधून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. येथे लाडक्या बहिणीचे पैसे थेट भावाच्या खात्यात पोहचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आधार कार्डवर खाडाखोड करत लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात येतील अशा पद्धतीने फॉर्म भरला. मात्र नंतर योजनेची ही रक्कम थेट सीएससी केंद्र चालकाने हडपल्याची घटना घडली आहे. योजनेबाबत हा धक्कादायक प्रकार नांदेडच्या ता. हदगाव येथे उघडकीस आला आहे.

नेमकं काय घडलं?

सचिन सीएससी सेंटर चालकाने हा प्रताप केला असून लाडक्या बहि‍णींची फसवणूक करत त्याने लाखोंचा घोटाळा केला आहे. गावातील महिलांचे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना त्याने महिलांचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी त्यांच्या पतींचा आधार क्रमांक टाकला होता. यावेळी त्यांचे खाते क्रमांक देखील देण्यात आले होते.

योजनेचे पैसे देखील त्यांच्या खात्यात जमा झाले. पुढे मात्र हे पैसे रोजगार हमी योजनेचे असल्याचे सचिन सीएससी सेंटर चालकाने सांगितले. पुढे त्याने रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले आहेत असे सर्वांना सांगितले. त्यानंतर ओळखीच्या पुरुषांकडून त्याने आधार कार्ड, बँक पासबुक ही कागदपत्रे मागवून घेतली. तसेच यावर पुरुषांचे अंगठे घेऊन जमा झालेली सर्व रक्कम स्वत:च्या खिशात घातली. मनाठा गावातील ३८ तर बामणी फाटा येथील ३३ व्यक्तींचा आधार क्रमांक वापरून तब्बल ३ लाख १९ हजार ५०० रुपये या व्यक्तीने लंपास केले आहेत.

सचिन सीएससी सेंटर चालकाचा प्रताप उघडकीस कसा आला?

गावातील अलीम सलीम कादरी यांना मोबाईलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याचा मॅसेज आला होता. त्यामुळे गावात याची एकच चर्चा सुरू झाली आणि सेंटर चालकाचं बिंग फुटलं.

चौकशी करण्याचे आदेश

घटनेची माहिती संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी या प्रकरणी अधिक चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT