Ladki Bahin Yojana: ...असं कराल तर कायद्याचा बडगा दाखवणार; बनावटपणे योजनेचा लाभ घेणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

Ajit Pawar: पुणे दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं सांगितलं.
Ladki Bahin Yojana: ...असं कराल तर कायद्याचा बडगा दाखवणार; बनावटपणे योजनेचा लाभ घेणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा
Ajit Pawar
Published On

तुमची ऐपत असतानाही असं कराल तर कायद्याचा बडगा दाखवणार, असा जबर इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या बनावट लाभार्थ्यांना दिलाय.अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर असून येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिलाय.

महायुती सरकारची महत्त्वकांक्षी योजना लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय ठरलीय. अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र काहीजण खोटी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा बनावट लाभार्थ्यांवर सरकार अंकूश लावत आहे. आता अजित पवार यांनीही, अशी चालबाजी करणाऱ्यांना इशारा दिलाय.

पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय. जिल्ह्यातील १८ लाख २८ हजार लाडकी बहिण अर्ज मंजूर झालेत. यात सर्वात मोठ्या संख्येने खेड तालुक्याला लाभ घेतलाय.त्याचवेळ त्यांनी बनावट लाभार्थ्यांना सुनावलंय.आमची द्यायची दानत आहे तुम्ही लाभ घ्या पण तुमची ऐपत असतानाही असं कराल तर कायद्याचा बडगा दाखवणार असा इशारा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष अजित पवारांनी दिलाय.

Ladki Bahin Yojana: ...असं कराल तर कायद्याचा बडगा दाखवणार; बनावटपणे योजनेचा लाभ घेणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा
Maharashtra Politics : राज्यात राजकीय कुटुंबामध्ये भूकंप, कुणा-कुणाची घरं फुटणार? वाचा

जे लाभार्थी संजय गांधी निरार्धार योजनेचा लाभ घेत असतील तर लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत नाही. कितीही केलं तरी ब्रम्हदेव आला तरी अर्ज टिकणार नाही. यावेळी अजित पवार यांनी एक उदाहरण सुद्धा दिलं. एका नवरा बायकोने २६ नावे दाखवत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अजित पवार म्हणालेत.

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची तयारी सुरू केली असून त्यांनी जनसंपर्क वाढवण्यासाठी जन सन्मान यात्रा सुरू केलीय.अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी येथील एका कार्यक्रमात बोलतांना लाडकी बहीण योजना, सरकारची कामे, सत्तेत सामील होण्यावरून होणारी टीका,कांदा निर्यातबंदी, यावर भाष्य केलं.

सरकारने केलेल्या कामांची माहिती देताना लोककल्याणकारी योजनांची माहिती देतांना त्यांनी बनावटपणे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांना इशारा दिलाय. याआधी लातूरमध्ये एका जोडप्याने बनावटपणा करत या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होत. या जोडप्याने विविध आधार कार्डांचा वापर व विविध पेहराव करून एकच बँक खाते क्रमांक देऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याचा प्रयत्न केला होता. साताऱ्यातही असाच बनावट प्रकार समोर आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com