Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी पात्रता काय? कोण करु शकणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki Bahin Yojana KYC Eligibility and Process: लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत केवायसी अनिवार्य

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी पात्रता

केवायसी करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, आता केवायसी केल्यानंतरही फक्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे केवायसी करताना पात्रता काय याबाबत सविस्तर जाणून घ्या.

लाडकी बहीण योजना केवायसी पात्रता (Ladki Bahin Yojana Eligibility)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ही १८ नोव्हेंबर आहे. त्यामुळे तुम्ही त्यापूर्वी केवायसी प्रोसेस पूर्ण करावी. यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. जर तुम्ही केवायसी केली तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी

  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात.

  • एका कुटुंबातील फक्त दोन महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात.

  • २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात

  • महिला लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असायला हवे.

  • लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे

  • महिलांच्या घरी चारचाकी वाहन नसावे.

या निकषांमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला १५०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनी केवायसी करायची आहे.

लाडकी बहीण योजना केवायसी प्रोसेस (Ladki Bahin Yojana KYC Process)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी सर्वात आधी https://www.ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या वेबसाइटवर जावे.

यानंतर केवायसी ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. यानंतर ओटीपी टाका.

यानंतर पुढे तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यांच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो टाका.

यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरे द्या. यानंतर केवायसी पूर्ण झाली असा मेसेज तुम्हाला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

Eye Yoga Exercise: चष्मा घालवायचा आहे? रोज फक्त 5 मिनिटे करा हा 'आय योगा'

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक-CM फडणवीस

Shocking: मुलगा झाल्यामुळे १ लाख मागितले, पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांना राग अनावर; महिलेवर गोळ्या झाडल्या

Crime News: नवऱ्याची हत्या केली नंतर मृतदेहाजवळ बसून पत्नीनं पाहिला अश्लील व्हिडिओ; धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT