Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना eKYC साठी मुदतवाढ मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana eKYC Deadline: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ करण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

लाडकीच्या केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार?

आतापर्यंत फक्त ८० लाख महिलांचे केवायसी पूर्ण

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख १८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. केवायसी केल्यानंतरच महिलांना पुढचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आतापर्यंत फक्त ८० लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केले आहे. त्यामुळे आता केवायसीसाठी मुदतवाढ करण्याची मागणी महलांनी केली आहे. यावर आता आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

ई केवायसीची मुदत वाढणार का? (Ladki Bahin Yojana eKYC Deadline Will Increase)

आदिती तटकरेंनी केवायसीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. आतापर्यंत ८० लाख महिलांचे ई केवायसी पूर्ण केले. १८ नोव्हेंबरपर्यंत आणखी लाभार्थ्यांचे केवायसी होईल. तरीसुद्धा जर सर्व लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण झाले नसेल तर परिस्थिती पाहून निर्णय घेता येईल, असं आदिती तटकरेंनी सांगितलं. त्यामुळे आता केवायसीची तारीख वाढणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारने ऑनलाइन पद्धतीने केवायसी करण्याची सुविधा सुरु केली आहे. तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन केवायसी करायचे आहे. दरम्यान, या प्रक्रियेत अनेकांना अडचणी येत आहेत. अनेकदा वेबसाइट लोड होत नाही तर अनेकदा ओटीपी येत नाही. त्यामुळे सरकारने ही सुविधा अधिक सोपी आणि सुलभ करण्यासाठी काही बदल केले आहेत. आता दिवसाला १० लाख महिला केवायसी करु शकतात. आधी ही मर्यादा ५ लाख होती.

नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana November Installment Update)

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आता नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर गेला होता. त्यामुळे आता नोव्हेंबरचा हप्तादेखील लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atharva Sudame : रीलमध्ये महिला प्रवाशांचा अवमान, पुण्याचा रिलस्टार अथर्व सुदामे अडचणीत, PMPL नं पाठवली नोटीस

Tilachi Vadi Recipe : मकर संक्रांतीला खास बनवा तिळाच्या वड्या, वाचा इंस्टंट रेसिपी

Municipal Election : आई लोकांच्या घरी धुणी भांडी करतेय, तर वडील चौकीदारी, भाजपनं पोराला दिली उमेदवारी

Winter Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढला, मुंबईसह अनेक भागांत शेकोट्या पेटल्या, वाचा आजचा हवामान अंदाज

Sachin Pilgaonkar : "तुमचं भलं होवो!"; सचिन पिळगांवकरांनी ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT