Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता लवकरच; कधीपर्यंत येणार?

Narhari Zirwal On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत नरहरी झिरवाळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिना संपला असूनही अद्याप पैसे आले नाहीत त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे. मात्र, आता महायुतीच्या मंत्र्यांनी एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत माहिती दिली आहे.

नरहरी झिरवाळांचे वक्तव्य (Narhari Zirwal Statement On Ladki Bahin Yojana)

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाडक्या बहिणींना दिलासा देणारे वक्तव्य केले आहे. हिंगोलीत महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ यांनी उपस्थिती लावली होती. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपयांचा हप्ता मिळेल, अशी माहिती दिली आहे विरोधक लाडक्या बहिणी विषयी चुकीच्या अफवा पसरत असल्याचे देखील यावेळी मंत्री झिरवाळ म्हणाले आहेत.

नरहरी झिरवाळ यांनी लाडक्या बहि‍णींना दिलासा दिला आहे. लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं त्यांनी सांगितलं आहे. विरोधक हे लाडकी बहीण योजनेबाबत अफवा पसरवत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका, असं नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं आहे.

या महिलांना मिळणार नाही पैसे

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) अपात्र महिलांना वगळण्यात आले आहे. ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यातून ज्या महिला निकषांमध्ये पात्र ठरणार नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत.या योजनेतून आतापर्यंत अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यापुढेही काही महिलांचे अर्ज बाद होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, राज्यात खळबळ

शेतकऱ्याच्या मोबदल्यासाठी टोलजप्ती, जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Saam Investigation: कृषी खात्यानं दिलेलं बियाणं बोगस, सरकारकडूनच शेतकऱ्यांची फसवणूक?

पवार शिंदे-भेट, ठाकरेसेना दुखावली, शिंदेंच्या दालनात पवारांच्या आमदारांची बैठक

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; डेक्कन क्वीनसह २२ गाड्या आठवडाभरासाठी रद्द, संपूर्ण यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT