Mukyamantri Ladki Bahin Yojana Saam Digital
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनापूर्वीच 'लाडकी'च्या खात्यात 3 हजार जमा, रवी राणांच्या वक्तव्यानंतर डॅमेज कंट्रोल

Girish Nikam

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यामध्ये जमा झाला आहे. 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही रक्कम जमा करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती. पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत. पाहूया एक रिपोर्ट....

लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर आता विधानसभेसाठी महायुती सज्ज झाली आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेद्वारे सत्ताधारी जनतेची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकारनं 'लाडली बहन' योजना राबवत 1250 रुपये महिलांना दिले होते. लोकप्रिय ठरलेल्या या योजनेनं भाजपला मध्यप्रदेशमध्ये सत्ताही दिली. आता महाराष्ट्रातही महायुती सरकार तो कित्ता गिरवत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. जून आणि जुलै महिन्याचे मिळून 3 हजार रुपये मिळाले आहेत. रक्षाबंधनापूर्वीच सरकारनं गिफ्ट दिल्यानं महिलांनी आनंद व्यक्त केलाय.

कुणाला मिळाले 3 हजार रुपये ?

31 जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. त्या लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्याचे मिळून 3 हजार रुपये मिळाले आहेत. ज्या महिलांनी या नंतर अर्ज भरले आहेत, त्यांना 17 ऑगस्ट रोजी या योजनेतील पैसे जमा होतील, असं सरकारनं स्पष्ट केलंय.आतापर्यंत एकूण ८० लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

निवडणुकीत ज्या बहिणी आशीर्वाद देणार नाहीत त्यांना योजनेतून दिलेले १५०० रुपये परत घेईन, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या मित्रपक्षाचे आमदार रवी राणा यांनी केले होते. राणा यांच्या वक्तव्याने सरकारच्या योजनेवर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. त्यावरून सरकारविरोधात टीकेची झोड उठली होती. राणांच्या वक्तव्याने निर्माण झालेले डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरकारने निर्धारित तारखेच्या ३ दिवस आधीच रक्कम जमा केली.

सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत आहोत, अशी ग्वाही आदिती तटकरेंनी ट्विट करुन दिली आहे. लाडकीची लोकप्रियता पाहून मविआ सरकारनेही सत्तेत आल्यास महालक्ष्मी योजनेचे सुतोवाच केले आहेत. आता विधानसभेत लाडक्या बहिणीचे आर्शिवाद कोणाला मिळणार ? याची उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT