Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! २१ हजार महिलांचे अर्ज बाद, यादीत तुमचंही नाव आहे का?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. अमरावती जिल्ह्यातील तब्बल २१ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अनेक लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद केले जात आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील २७ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील तब्बल २१ हजार ९३७ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

२१ हजार महिलांचे अर्ज बाद

अमरावती जिल्ह्यातील ४७ महिलांनी स्वतः हून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला आहे. सध्या अमरावतीत ६ लाख ९५ हजार ३५० महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. विविध कारणांमुळे २१ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांना आता कधीच या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची नोंदणी बंद झाली आहे. त्यामुळे इथून पुढे कोणालाही या योजनेसाठी अर्ज करता येणार नाहीये.

कोणाला मिळणार नाही लाभ? (These Women Will Not Get Benefit Of Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे. अमरावतीमधील २१ हजार महिलांचे अर्जदेखील याच कारणांमुळे बाद केले आहे. महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त. त्यांच्याकडे चारचाकी वाहन, इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्हीही निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर तुम्हालाही योजनेचा लाभ मिळणार नाही.

जुलैचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana July Month Installment Date)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जुलैचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारत आहेत.दरम्यान, जुलैच्या हप्ता पुढच्या दोन आठवड्यांमध्ये यायला हवा. याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच माहिती दिली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT