Ladki Bahin Yojana allowance hike news saam tv
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना मिळणार 3000? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार

Ladki Bahin Yojana 3000 Rupees Latest Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ होणार का? सध्या मिळणारे 1500 रुपये वाढवून 3000 रुपये करण्याच्या मागणीवर छगन भुजबळ यांनी मोठे आश्वासन दिले आहे.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहीणींना सध्या दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी जोर धरत असताना, याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे आश्वासन दिले आहे. मानधनवाढीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत आवश्यक प्रस्ताव मांडण्यात येईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकी दरम्यान सरकारने लाडक्या बहीण योजनेचा हप्ता 3000 केला जाईल असे आश्वासन दिले होते. यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महिला वर्गाचे मत देखील मिळाले. मात्र सरकार स्थापन होऊन 2 वर्ष झाली. तरी देखील हप्त्यात वाढ झाली नाहीये. यावरून विरोधी पक्ष देखील आक्रमक झाला होता. अनेकांचे अर्ज देखील बाद झाले. यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर उमटला आहे.

याच सगळ्या विषयावर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत लाडकी बहीण योजनेसह महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी पात्र लाभार्थी महिलांचे थकीत हप्ते, नियमित मानधन आणि ई- केवायसीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. या सर्व मुद्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र, या मानधनात वाढ करून महिलांना अधिक आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या आश्वासनानंतर लाडक्या बहीणींच्या मानधनात वाढ होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cooking Tips : चपात्या तासनतास मऊ आणि लुसलुशीत राहण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

नगरसेवकपद देतानाच ६ जणांकडून घेतले राजीनामे; नाशिक महापालिकेत भाजपचा अजब फॉर्म्युला

Vastu Tips for Dining : घरात 'या' 5 ठिकाणी बसून जेवण करणे टाळा; अन्यथा घरात येऊ शकते नकारात्मक ऊर्जा!

Maharashtra News Live Update: एसटी कर्मचाऱ्यांच काम बंद आंदोलन थांबविण्यात परिवहन विभागाला यश

सावधान! मोमोजसोबत मिळणारी लाल चटणी ठरू शकते आरोग्यासाठी घातक

SCROLL FOR NEXT