Accused arrested in Jalgaon for allegedly harassing a woman under the pretext of E-KYC verification in a government scheme. saam tv
महाराष्ट्र

लाभार्थी महिलेकडे शरीरसुखाची मागणी, e-KYC च्या नावाखाली महिलेचा छळ

Ladki Bahin Scheme Ekyc Harassment Jalgaon Case: लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कारण E-KYCच्या नावाखाली एका नराधमानं महिला लाभार्थीचा विनयभंग केलाय. लाडकीसोबत नेमकं काय घडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

राज्य सरकारची 'लाडकी बहीण' योजना गरजू महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी सुरु करण्यात आलीये. मात्र याचं योजनेचा आधार घेत काही नराधम लाभार्थी महिलांच्या अब्रुला हात घालण्याचा धक्कादायक प्रयत्न करतायेत. जळगावमध्ये ई- केवायसी करण्याच्या बहाण्याने एका महिलेकडे चक्क शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय...

जळगावात पीडित महिलेसोबत नेमकं काय घडलं?

जळगाव शहरात राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेला 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळवून देतो, असे आमिष आरोपी गोकुळ चव्हाण याने दाखवले. योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता आणि केवायसी करणे गरजेचे असल्याचे सांगून तो पीडितेच्या घरी गेला. मात्र, सरकारी कामात मदत करण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या आरोपीनं महिलेकडे थेट शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. महिलेच्या पतीनं तंबी देऊनही आरोपी पुन्हा त्याच परिसरात येतो. पीडित महिलेचा पाठलाग करत असल्याचाही आरोप आहे. तसंच एका महिलेला विधवा पेन्शन सुरु करण्याच्या बहाण्यानं प्रेमसंबंधांची मागणी केल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान सरकार 'लाडकी बहीण' म्हणत असताना दुसरीकडे त्याच बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. केवायसीची जाचक अट रद्द करा, अशी मागणी विरोधकांनी केलीय...दुसरीकडे जळगाव पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पीडितेच्या तक्रारीनंतर गोकुळ चव्हाणला ताब्यात घेत विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.....

जळगावची ही घटना म्हणजे केवळ एक गुन्हा नसून, समाजात वावरणाऱ्या विकृत मानसिकतेचे दर्शन आहे. अशा प्रवृत्तींना पोलीस प्रशासनाचा धाक उरला नाही. हे वास्तव आहे. यापुढे लाडकीच्या सुरक्षेसाठी आणि अशा घटना घडू नयेत यासाठी काय कडक पाऊलं उचलली जातायेत ? ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाकिस्ताननं फिरवला भिकेचा कटोरा, बुडत्या पाकला उधारीचा आधार

तरुणांच्या लग्नात भूकंपाचं विघ्न, 200 लग्नाळू तरुणांना मुलगी मिळेना

Amboli Ghat accident : आंबोली घाटात भयंकर अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, बापाच्या डोळ्यासमोर लेकीचा मृत्यू

युद्धभूमीवर शत्रूविरोधात AIचा वापर, तेहरानवरील हल्ल्यांमागे AI चा सल्ला

खासदार राहुल गांधींची काँग्रेसमधून हाकलपट्टी होणार? मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT