Ladki Bahin Yojana Update Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'कडून 1500 वसूल करणार? लाडकींना लाभ सोडण्याचं दादांकडून आवाहन, VIDEO

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहिण योजनेचा लाभ काही आयकरदात्या महिलाही घेत आहेत. त्यावरुन अर्थमंत्र्यांनी स्वत:हून योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन श्रीमंत लाडकींना केलं आहे. पाहूया एक खास रिपोर्ट.

Girish Nikam

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारसमोर आता ही योजना पुढे सुरु ठेवण्यासाठी कसरत सुरु आहे. 1500 रुपयांवरुन 2100 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता असतानाच लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. ज्यांनी चुकीचा पद्धतीनं योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून पैसे वसूल होणार असे संकेत मिळतायेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जालन्यात बोलताना लाडक्या बहि‍णींना धक्का दिला. गरज नसणाऱ्यांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे श्रीमंत बहिणींनी योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन अर्थमंत्र्यांनी केलंय.

या योजनेचे 2 कोटी 34 लाख लाभार्थी आहेत. या योजनेचा सहावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात 24 डिसेंबरपासून वर्ग झाला. आता सातवा हफ्ता 26 जानेवारीपासून मिळणार आहे. अर्थमंत्र्यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमिवर या योजनेचे महत्वाचे निकष कोणते आहेत ते पाहूया...

लाडकीसाठी पात्रतेचे निकष

- वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे

- कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नसावा

- कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा

- ट्रॅक्टर सोडून इतर चारचाकी वाहन नसावे

अर्जांची फेर पडताळणी करुन चुकीचा लाभ घेतलेल्यांना माहिती देऊ, असं महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंनी म्हटलंय.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचं नाही. त्यामुळे सरकार सावध भूमिका घेऊन आवाहन करतंय. महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आणि मुलींना स्वावलंबी करण्याचं सरकारचं ध्येय आहे. मात्र यापुढे गरजवंतांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत. तिजोरीत खडखडाट असताना मोठा आर्थिक भार असलेली ही योजना राबवताना तसेच पुढे 2100 रुपये देताना सरकारची दमछाक होणार आहे. एव्हढं मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT