Gulabrao Patil on Kunal Kamra Saam TV News
महाराष्ट्र

त्याची माफी मागायची इच्छा नाही, पण तो बाहेर येईलच ना; शिवसेना नेत्याने कुणाल कामराला दम भरला

Gulabrao Patil on Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामराने शिवसेनेचे तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या कवितेमुळे शिवसेनेचे नेते खूपच संतापलेले आहेत. सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर कामराला चेतावनी दिलीय.

Prashant Patil

मुंबई : विनोदी कलाकार कुणाल कामराने शिवसेनेचे तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या कवितेमुळे शिवसेनेचे नेते खूपच संतापलेले आहेत. आता महाराष्ट्र सरकारमधील तथा शिवेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, आम्ही आमच्या पद्धतीने काम करु. कुणाल कामराने स्पष्ट केलंय की तो माफी मागणार नाही. रविवारी संतप्त शिवसैनिकांनी त्याच्या कॉमेडी क्लबची तोडफोड केली.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जर त्याने माफी मागितली नाही तर आम्ही त्याला आमच्या शैलीत उत्तर देऊ. त्याने माफी मागण्यास नकार दिलाय, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याला सोडून देऊ. तुम्ही दाढीवाला , चष्मावाला, रिक्षावाला म्हणाल तर आम्ही ते सहन करणार नाही. जर त्याने माफी मागितली नाही तर तर तो नक्कीच कधीतरी बाहेर येईल, तो कुठे लपून बसणार आहे. सरकारची भूमिका काय असेल ते मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं आहे. मात्र, शिवसेना स्वत:ची भूमिका मांडेल.

दरम्यान, कुणाल कामरा प्रकरणाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खरं म्हणजे आरोपांवर मी प्रतिक्रिया देतच नाही. अडीच वर्ष सातत्याने पहिल्या दिवसापासून सरकार स्थापन झाल्यापासून आरोपांच्या फैरी लोकं झाडत होते. आम्ही पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला वगैरे आरोप करुनही जनतेने जर आम्हाला मँडेट दिला असेल, तर तुम्ही गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे समजून जा.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे ठिक आहे, पण त्याचा गैरफायदा घेऊन बोलणार असाल तर हा एक प्रकारचा व्यभिचार, स्वैराचार आणि एकप्रकारे सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे. शिंदेंनी बीबीसी मराठीच्या एका कार्यक्रमात बोलताना असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT