Agricultural Produce Market Committees Elections: Saam TV
महाराष्ट्र

Bazar Samiti Election: राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

APMC Election: ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Market Committee Election: राज्यातील राजकारणात राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. कारण, ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. प्रशासनाकडून सकाळपासूनच ठिकठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Latest Marathi News)

त्यामुळं आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात २५७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (APMC Election) निवडणुका सुरू आहेत. या बाजारसमित्यांसाठी आज आणि रविवारी (३० एप्रिल) मतदान पार पडणार आहे.

आज १४७ तर रविवारी ८८ बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, राज्यातील १८ बाजारसमित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. राज्याच्या राजकारणात दहा महिन्यापूर्वी मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेतून उठाव करत एकनाथ शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. (Breaking Marathi News)

दरम्यान, राजकीय उलथापालथीनंतर राज्यातील ग्रामीण पातळीवर होणारी ही दुसरी निवडणूक आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निकालांचा धुराळा पाहायला मिळाला होता. या निवडणूकीत एकनाथ शिंदेंच्या गटाने बऱ्याच ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला होता. आता ग्रामीण भागातील राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात चुरस दिसून आली.

या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसह ठाकरे गट व शिवसेनेसह इतर पक्षांतील बडे नेते उतरले आहेत. त्यामुळे पॅनलच्या माध्यमातून बाजार समित्यांवर युती की महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Political News)

आज कोणकोणत्या बाजारसमित्यांसाठी मतदान

दरम्यान, आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, जळगाव यांसारख्या मोठ्या बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या भागात ताकद लावली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT