sangli krishna river over flooded saam tv
महाराष्ट्र

Sangli : सतर्क राहा ! कृष्णा नदीचे पाणी वाढतेय, पुराच्या धोक्यामुळे काठावरील नागरिकांना इशारा

राज्यभरात पडत असलेल्या पावसामुळं बहुतांश जिल्ह्यातील धरणातून पाणी साेडलं जात आहे. त्यामुळं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.

विजय पाटील

Krishna River : कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सांगली (sangli) जिल्ह्यातील तीन पूल आणि तेरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ज्या ठिकाणी बंधाऱ्यावरती पाणी आले आहे तेथे पोलिसांनी बॅरेकट लावलेले आहेत. दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ हाेत असल्याने सांगली महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी वाढण्याच्या आत स्वतः हुन स्थलांतर व्हावे असे आवाहन केले आहे. (Sangli Rain Update)

राज्यभरात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. सांगली जिल्ह्यात देखील जाेरदार पाऊस बरसत आहे. यामुळं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. येथील कृष्णा नदीची पाणी पातळी अठ्ठावीस फुटांवर पाेहचली आहे. कृष्णेची इशारा पातळी 40 फुटांवर आहे तर धाेक्याची पातळी 45 फुट असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

दूसरीकडं अलमट्टी धरणातून दोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळं सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान पावसामुळं (Rain) जिल्ह्यातील तीन पूल आणि तेरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी आजूबाजूच्या शेतात पाणी शिरलं आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बहुतांश शेतक-यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT