Koyna Express Accident :  Saam tv
महाराष्ट्र

Koyna Express Accident : कोयना एक्सप्रेसच्या धडकेत ३ महिलांचा मृत्यू; कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना

Koyna Express Accident Update : कोल्हापुरात तिघांना रुळावर चालणे महागात पडले आहे. कोल्हापुरात कोयना एक्सप्रेसखाली सापडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

रणजीत मांजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसखाली सापडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

कोल्हापुरात शुक्रवारी रात्री भीषण दुर्घटना घडली आहे. कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसने तिघांना चिरडलं आहे. मुंबईतून कोल्हापूरात येणाऱ्या कोयना एक्स्प्रेस रेल्वेने तीन महिलांना चिरडल्याने तिघींचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

रुळावरून चालत येत असताना ही दुर्देवी घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अपघातात रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटलेली नाही. ही दुर्घटना अपघात की आत्महत्या याबाबत शाहूपुरी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

कोल्हापुरातील दुर्देवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या दोन महिला आणि लहान मुलगी कुठे चालल्या होत्या, याचा तपास पोलिसांनी सुरु केलाय. या महिलांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

धावत्या ट्रेनमधून प्रवाशांनी मारल्या उड्या

दरम्यान, झारखंडच्या लातेहारमध्येही शुक्रवारी भयानक घटना घडली. रांची-सासाराम इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी आरडओरड केली. काही धावत्या ट्रेनमधून बाहेर उड्या मारल्या. या घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamil Nadu Politics : थलापती विजय यांच्यासमोर पेच वाढला; राज्यपालांनी दुसऱ्यांदा माघारी धाडलं, TVK समोर पर्याय काय?

Maharashtra News Live Update: वांगणी आणि परिसरात जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

उल्हासनगर रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर राडा; डॉक्टरांवर हल्ला अन् हॉस्पिटलची तोडफोड|VIDEO

Thalapathy Vijay: थलपती विजयवर दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं अपघातात निधन, पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप

Gold Rate : सुवर्ण बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ, चांदी ८००० रुपयांनी महागली; वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT