Chandrashekhar Bawankule  Saam Tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: पटोलेंविरोधात ठिय्या आंदोलन, बावनकुळेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं

नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्याप्रकरणी नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यादरम्यान ठिय्या आंदोलनावर बसलेले भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे (Koradi Police Took Chandrashekhar Bawankule In Custody).

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी कोराडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. नाना पटोले त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बावनकुळे यांनी हा ठिय्या मांडला होता. यावेळी प्रकरण तपासल्यावर कारवाई करु, असं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं.

मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही असल्यानं आणि ठिय्या आंदोलन थांबवत नसल्यानं पोलिसांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना ताब्यात घेतलं. भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा कोराडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. तसेच, बावनकुळे यांनी काल कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आज कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.

नागपुरात नाना पटोले यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली

नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झालीय. याच पार्श्वभूमीवर नागपुरात नाना पटोले यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीये. पटोले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप राज्यभरात आंदोलन करत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावी, यासाठी भाजप आक्रमक आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पटोले यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

SCROLL FOR NEXT