Konkan Railway News Saam Tv
महाराष्ट्र

Konkan Railway : कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! रोहा स्थानकावर थांबणार एक्स्प्रेस ट्रेन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Konkan Railway News : रत्नागिरी ते पनवेल या ४०० किमी अंतरामध्ये रेल्वे स्थानक नव्हते. यामध्ये एखादे स्थानक असावे अशी मागणी प्रवासी करत होती. प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Konkan Railway News : कोकणातील रेल्‍वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता रोहा स्थानकावर लांबपल्ल्याच्या १० अतिजलद गाड्या (एक्स्प्रेस ट्रेन) थांबणार आहेत. रत्नागिरी ते पनवेल यामध्ये थांबा असावा अशी कोकणातील प्रवाशांची मागणी होती. खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाली आहे. आता अलिबागपासून खेडपर्यंच्‍या प्रवाशांना याचा लाभ होणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.

रोहा स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबणाऱ्या १० अतिजलद गाड्या :

1. 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस

2. 11100 मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

3. 22629 दादर- तिरुनेलवेली एक्सप्रेस

4. 22630 तिरुनेलवेली - दादर एक्सप्रेस

5. 12217 कोचुवेली- चंदीगढ़ एक्सप्रेस

6. 12218 चंदीगढ़ - कोचवेली एक्सप्रेस

7. 20931 कोचुवेली - इंदूर एक्सप्रेस

8. 20932 हिसार-कोइंबतूर एक्सप्रेस

9. 22475 कोइंबत्तूर - हिसार एक्सप्रेस

10. 22476 कोइंबतूर-हिसार एक्सप्रेस

रोहा स्थानकावर थांबणाऱ्या १० अतिजलद गाड्यांपैकी एक असलेल्या कोचुवेली इंदोर एक्‍सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत केले. या प्रसंगी त्यांनी एक्स्प्रेसचे पहिले तिकीट एका प्रवाशाला दिले. गाडीच्या स्वागतासाठी रोहेकरांनी मोठी गर्दी केली होती. मंत्री आदिती तटकरेदेखील तेथे उपस्थित होत्या.

Express Train list

याविषयी माहिती देताना सुनील तटकरे म्हणाले, 'दूर पल्ल्याच्या गाड्यांना मध्ये थांबा मिळावा, अशी मागणी प्रवासी करत होते. रत्नागिरीला थांबा आहे आणि त्यानंतर थेट पनवेलला आहे. पण रत्नागिरी ते पनवेल हे अंतर जवळपास ४०० किमी आहे. अशा वेळी दक्षिण ते उत्तर अशी कोकण रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि उत्तर रेल्वे धावते. रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. आधी येथे (रोहा स्थानकावर) तांत्रिक थांबा होता पण आता रोह्याला गाड्यादेखील थांबणार आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महापौर पदग्रहण कार्यक्रमात उफाळून आली भाजपमधील गटबाजी

पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि महिला कॉन्स्टेबल नशेत बेधुंद; बेडरूममधील अश्लील व्हिडिओ व्हायरल, कर्मचारी वर्तुळात खळबळ

Black Saree Contrast Blouse: काळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसतील हे ७ ट्रेंडी आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज

Sambhajinagar News : 'आता उद्यापासून बांगड्या घालायला लावू' छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, काय आहे प्रकरण?

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची नावे द्या आणि बक्षिसं जिंका, पोलिसांची अनोखी योजना

SCROLL FOR NEXT