Konkan Railway Mega Block: कोकण रेल्वे मार्गावर ३० दिवसांचा मेगाब्लॉक; कसं असेल वेळापत्रक? कोणत्या स्थानकापर्यंत असणार सेवा?
Konkan Railway Mega Block  Saam Digital
महाराष्ट्र

Konkan Railway Mega Block: कोकण रेल्वे मार्गावर ३० दिवसांचा मेगाब्लॉक; कसं असेल वेळापत्रक? कोणत्या स्थानकापर्यंत असणार सेवा?

Sandeep Gawade

मान्सूनमध्ये कोकणाचं निसर्गसौंदर्य अधिकच बहरतं. डोंगर कपाऱ्यांमधून कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून पर्यटक येत असतात. कोकणाचं पर्यटन देशभरात पोहोचवण्यात कोकण रेल्वेचा मोठा वाटा आहे. मात्र ऐन मान्सून हंगामात कोकण रेल्वे मार्गावर ३० दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 30 जून ते 30 जुलै दरम्यान हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणवासियांना याचा फटका बसणार असून पर्यटनावरही परिणाम होणार आहे.

रेल्वे मार्गाच्या देखभालीसाठी तसेच इतर कामांसाठी रेल्वे विभागामार्फत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तब्बल 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. ३० दिवसांच्या या कालावधीत कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या कालावधीत या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंतच सुरू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनल, मुंबई येथे यार्ड फिट लाईनच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेणार आहे. जवळपास महिनाभर हे काम चालणार आहे. त्यामुळे ट्रेन पनवेलपर्यंच धावणार आहेत. तिरुअनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनल (16346) नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास 30 जून ते 30 जुलै या कालावधीत पनवेल पर्यंत असणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनल-तिरुवनंतपुरम सेंट्रल (16345) नेत्रावती एक्सप्रेसचा प्रवास लोकमान्य टिळक टर्मिनलऐवजी पनवेल स्थानकावरून सुरू होणार आहे. मंगळुरु सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनल (12620) मत्स्यगंधा एक्स्प्रेस पनवेल स्थानकावरुन सोडण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल – मंगळुरु सेंट्रल (12619) मत्स्यगंधा एक्स्प्रेस पनवेल स्थानकावरून दररोज दुपारी 4.25 वाजता सुटेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?

Solapur Breaking : शेतकऱ्यावर कोसळलं आभाळ, महावितरणच्या विद्युत तारेने केला घात; ओढ्यात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

Aadhaar Card: आता आधार कार्ड बनवायला लागू शकतात 6 महिने, UIDAIने केले 3 मोठे बदल

Shukra Rashi Parivartan : ४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार; यशाचा मार्ग गवसणार, वाचा

Pune Tourist Places: पुण्यात पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू! कुठल्या ठिकाणी जमावबंदी आणि काय आहेत नियम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT