कोकण हा पहिल्यापासूनचा शिवसेनेचा बालेकिल्ला..कोकणी माणूस हा मनाने ठाकरेंशी जोडला गेलेला..आव्वाज कुणाचा याला इथलं उत्तर शिवसेनेचा असं यायचं. मात्र मधल्या काळात पुलाखालून बरचं पाणी वाहून गेलं आणि यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर ठाकरेसेनेचा आवाज घुमलाच नाही..याला कारण ठरलयं ते कोकणात नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीत पडलेली वादाची ठिणगी..सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर धाड टाकून महायुतीतल्या मित्रपक्षावर आरोपाची राळ उठवली....
दुसरीकडे निलेश राणेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून नितेश राणेही मैदानात उतरले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चा सुरु झाली राणे बंधूंमधील वादाची...नगरपरिषदेची संपूर्ण निवडणुक निलेश राणेंच्या आरोपांनी आणि राणे बंधूंमधील वादावादीनं चांगलीच रंगली.महायुतीतल्या या अंतर्गत आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय मुद्दा जोरकसपणे मांडण्याची संधीच ठाकरेसेनेकडे उरली नाही...
दरम्यान निलेश राणेंनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपामुळे महायुतीतील मतभेदाचा मुद्दाच राजकीय घटनांच्या केंद्रस्थानी आला...ज्यामुळे ठाकरेसेनेला महायुतीविरोधात मोर्चेबांधणी करण्याची किंवा भाजपवर वेगळे आरोप करण्याची गरजच उरली नाही...अशातच कोकणच्या राजकारणाची चर्चा 'ठाकरे विरुद्ध राणे' ऐवजी 'निलेश राणे विरुद्ध भाजप ' अशीच राहिली.. उलट ठाकरेसेनेबद्दल असणारी सहानभूती आणि स्थानिक मुद्दे मागे पडल्यानं ठाकरेंची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पेस कमी झाली..
आता नगरपरिषदेत बॅकफुटवर गेलेली ठाकरेसेना पुढच्या निवडणुकीत महायुतीच्या वादात स्थानिकांच्या समस्यांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून जनमतांचा कौल मिळवते की पुन्हा युतीच्या अंतर्गंत आरोप-प्रत्यारोपामध्ये झाकोळून जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.