Kokan Express Way Saam Tv
महाराष्ट्र

Kokan Express Way: आता गोव्याला जा सुसाट! ६०० किमीचा प्रवास फक्त ६ तासांत पूर्ण होणार, कसा आहे मेगाप्लान?

Mumbai- Goa Expressway: मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी लागणारा १२ तासांचा वेळ आता फक्त ६ तासांवर येणार आहे. कारण कोकण एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर तुम्हाला गोव्याला अगदी सुसाट जाता येणार आहे.

Priya More

मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई ते गोवा हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी किमान १० ते १२ तासाचा कालावधी लागतो. या प्रवासासाठी खर्च देखील जास्त येतो आणि वेळही लागतो. पण आता कोकण एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त ६ तासांत पूर्ण होणार आहे. या एक्स्प्रेस वेचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे आणि लवकरच हा एक्स्प्रेस वे तुमच्या सेवेसाठी तयार होणार आहे.

एक्स्प्रेस वेचे काम अंतिम टप्प्यात -

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे बांधलेल्या पॅसिफिक हायवेच्या धर्तीवर देशात हा एक एक्स्प्रेसवे बांधला जात आहे. या एक्स्प्रेसवेचे बांधकाम १४ वर्षांपूर्वी सुरू झाले होते जे आता पूर्णत्वाच्या जवळ पोहचले आहे. एकदा हा एक्स्प्रेसवे तयार झाला की प्रवासासाठी लागणारा वेळ निम्मा होईल. म्हणजे सध्या मुंबई- गोवा प्रवासासाठी १२ तासाचा वेळ लागतो. एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त ६ तासांत पूर्ण करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे हा एक्स्प्रेसवे इतका सुंदर आहे, की त्यावरून प्रवास करणे हे एखाद्या पिकनिकपेक्षा कमी नाही. एका बाजूला उंच हिरवे पर्वत आणि दुसऱ्या बाजूला समुद्राचे दृश्य तुम्हाला अनुभवता येणार आहे.

४९८ किमी अंतर ६ तासांत -

गेल्या १४ वर्षांपासून वाट पाहत असलेल्या या एक्स्प्रेस वेचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. ६ पदरी प्रवेश-नियंत्रित महामार्गामुळे मुंबई आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १२ तासांवरून ६ तासांपर्यंत कमी होईल. हा ३७६ किमी लांबीचा एक्स्प्रेसवे कोकण किनाऱ्यावर बांधला जात आहे म्हणून त्याला 'कोकण एक्स्प्रेसवे' असे म्हटले जाणार आहे. एक्स्प्रेसवेच्या बाजूने १२० किमी लांबीचा रस्ता देखील बांधला जाणार आहे अशाप्रकारे एकूण अंतर ४९८ किमी असेल. हे अंतर फक्त ६ तासांत पार करता येणार आहे.

२०११ मध्ये बांधकाम सुरू -

२०११ मध्ये बांधकाम सुरू झाल्यापासून या प्रकल्पाला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले आहे. वारंवार तारीख वाढवण्यामुळे त्याची किंमतही दुप्पट झाली आहे. एनएचएआयच्या मते, या एक्स्प्रेस वेवर बांधल्या जाणाऱ्या स्ट्रेच रोडचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. हा रस्ता दोन भागात बांधला जात आहे. पहिला पनवेल ते कासू (४२.३ किमी) आणि कासू ते इंदापूर (४२.३ किमी) आहे. एक्स्प्रेस वेसाठी १४६ हेक्टर वनजमीन संपादित करावी लागली आहे.

एक्स्प्रेस वेवर असणार ४१ बोगदे -

कोकण एक्स्प्रेस वे हा महत्वाच्या पायाभूत सुविधांसाठी देखील ओळखला जाणार आहे. कोकणातील कठीण रस्ते, नद्या आणि पर्वत ओलांडण्यासाठी बोगदे आणि पूल बांधले जात आहेत. कोकण एक्स्प्रेस वेवर जवळपास ४१ बोगदे आणि २१ मोठे पूल बांधले जातील. या मार्गावर विविध जिल्ह्यांमध्ये ४१ लहान पूल देखील असणार आहेत. कर्जा येथील धरमतर खाडीवर सर्वात मोठा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल १०.२ किमी लांबीचा आहे. ७ मोठ्या पुलांची एकूण लांबी जवळपास २७ किमी इतकी असेल.

किती पैसे खर्च झाले आणि मार्ग कोणता आहे?

कोकण एक्स्प्रेस वेच्या बांधकामाचा अंदाजे खर्च ६८,००० कोटी रुपये इतका आहे. यामध्ये सुमारे ३,७९२ हेक्टर जमीन संपादित करण्याचा खर्च देखील समाविष्ट आहे. यापैकी सुमारे १४६ हेक्टर जमीन वन विभागाची आहे. कोकण एक्स्प्रेस वे पनवेल (नवी मुंबई) ते सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी यांना जोडेल. या महामार्गावर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांतील १७ तालुके आणि २३२ गावे जोडली जाणार आहेत. एक्स्प्रेस वेवर १४ इंटरचेंज बांधण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT