Kolhapur Transgender Assaults Police Saam
महाराष्ट्र

पैसे मागण्यावरून तृतीयपंथीयाचा कोल्हापुरात राडा; पोलिसांना शिवीगाळ अन् मारहाण, VIDEO व्हायरल

Kolhapur Transgender Assaults Police: कोल्हापूरात तृतीयपंथी व्यक्तीने जबरदस्ती पैसे मागून परिसरात गोंधळ घातला. पोलिसांनी रोखल्यावर तृतीयपंथी व्यक्तीनं शिवीगाळ करत मारहाण केली.

Bhagyashree Kamble

  • कोल्हापुरात तृतीयपंथी अन् पोलिसांमध्ये राडा

  • तृतीयपंथी व्यक्तीकडून पोलिसांना शिवीगाळ अन् मारहाण

  • शाहूपुरी पोलिसांनी तृतीयपंथी व्यक्तीला घेतलं ताब्यात.

कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोल्हापुरातील दाभोकर कॉर्नर चौक परिसरात तृतीपंथी व्यक्तीनं गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. संबंधित तृतीयपंथी व्यक्ती जबरदस्तीने पैसे मागत होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला रोखले. मात्र, पोलिसांच्या या कारवाईचा राग मनात धरून त्या तृतीयपंथी व्यक्तीनं पोलिसांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली.

कोल्हापुरात पोलीस आणि तृतीयपंथीमध्ये तुंबळ हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कोल्हापुरातल्या दाभोळकर कॉर्नर चौक परिसरातून उघडकीस आली. तृतीयपंथी या परिसरात जबरदस्तीने पैसे मागत होती. यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी संबंधित तृतीयपंथीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तृतीयपंथीयाला राग अनावर झाला. तृतीयपंथी व्यक्तीनं पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली.

या घटनेत पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. घटनेनंतर संबंधित तृतीयपंथी व्यक्तीला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

Monday Horoscope : महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर पडणार, धनलाभ होणार; ५ राशींच्या लोकांना कमाईचा नवा मार्ग मिळणार

IND Vs PAK : टीम इंडियात मोठे बदल! हार्दिक, अर्शदीप बाहेर; कोणाला मिळाली संधी? पाहा Playing XI

मुंबई - गोवा महामार्गावर, माणगावमध्ये वाहतूक कोंडी|VIDEO

Maharashtra Live News Update: जालन्यातील गोदाकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT