चंदगड तालुक्यातील हंडेवाडी येथे तिन्ही मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू
मुली आजीच्या अंत्यविधीसाठी गावात आल्या होत्या
खेळताना पाण्यात पडल्याची प्राथमिक शक्यता
घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली
रणजित माजगावकर, कोल्हापूर
Kolhapur Chandgad 3 Girls Death Tragedy कोल्हापूरच्या चंदगडमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. आजीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या तीन शाळकरी मुलींचा हंडेवाडी येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २५ मे सोमवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिया आणि धनुष्का यांच्या वडिलांची आई तसेच स्वराच्या आईची आई असलेल्या सुशीला सांबरेकर (वय ७०) यांचे आठ दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने कुटुंबीय हंडेवाडी येथे जमले होते. सोमवारी दुपारी तिन्ही मुली गावाजवळील शेततळ्याजवळ गेल्या असता हा दुर्दैवी प्रकार घडला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र, तिघींनाही बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता. मृत मुलींमध्ये धनुष्का पांडुरंग सांबरेकर (वय १५), रिया चंद्रकांत सांबरेकर (वय १२) आणि स्वरा जयंत नाईक (वय १३) यांचा समावेश आहे. धनुष्का आणि रिया या दोघी मूळच्या आंबेवाडी (ता. बेळगाव) येथील असून सध्या गोव्यातील पर्वरी येथे वास्तव्यास होत्या. तर स्वरा ही मूळची होसूर (ता. चंदगड) येथील असून सध्या उचगाव (ता. करवीर) येथे राहत होती.
या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अल्पवयीन मुलींचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.