Kolhapur News  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Tragedy : अग्निशमन दलाच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू तर सहा जखमी

Kolhapur News : कोल्हापुरातील फुलेवाडी फायर स्टेशनजवळ बांधकाम सुरू असलेला इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. या घटनेत अनेक कामगार अडकले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी आहेत.

Alisha Khedekar

  • कोल्हापुरात फुलेवाडी फायर स्टेशनजवळ इमारतीचा स्लॅब कोसळला आहे.

  • या दुर्घटनेत चार ते पाच कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.

  • स्थानिक नागरिक, फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी मिळून मदतकार्य सुरू केले आहे.

  • महिलांच्या आक्रोशाने आणि भीतीने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हापुरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. फुलेवाडी फायर स्टेशनजवळ सुरू असलेल्या नव्या बांधकाम इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत काही बांधकाम कामगार अडकले. तर काहींना बाहेर काढण्यात यश आले आहे. या संपूर्ण घटनेने परिसरात सर्वत्र भी‍ती, चिंता आणि बांधकाम कामगार महिलांच्या आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राचे बांधकामावर रात्री आठ-साडेआठच्या सुमारास स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. यादरम्यान अचानक जोराचा आवाज झाला आणि स्लॅब कोसळला. काही कामगार वर काम करत होते, तर काही स्लॅबच्या खाली होते. स्लॅब कोसळताच प्रचंड आवाज झाला आणि धावपळ उडाली. क्षणार्धात चार ते पाच कामगार ढिगाऱ्याखाली अडकले.

या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना वाचवविण्यासाठी त्यांनी हाताने कोसळलेल्या स्लॅबच्या तारा आणि सिमेंटचा ढीग उचलण्यास सुरुवात केली. ‘आमच्या डोळ्यासमोर हे घडत होते... त्यांचा आरडाओरडा ऐकून आम्ही घाबरलो. पण, वेळ वाया घालवला नाही. जीव धोक्यात घालूनही आम्ही ढिगारा बाजूला करण्यास सुरुवात केली,’ असे स्थानिकांनी सांगितले.

या घटनेने कामगार महिलांना जबर धक्का बसला. अडकलेले बहुतेक कामगार हे त्यांचेच सहकारी असल्याने त्या हंबरडा फोडून रडत होत्या. ‘त्यांना बाहेर काढा, त्यांना वाचवा,’ असे म्हणत त्या फायर ब्रिगेडच्या जवानांसमोर हात जोडून विनवणी करत होत्या. काही महिला तर अर्धवट बेशुद्ध झाल्या. त्यांना शेजारील नागरिकांनी पाणी पाजून आधार दिला. त्यानंतर त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

स्लॅबच्या ढिगाऱ्यातून ठिकठिकाणी लोखंडी सळया बाहेर आल्या होत्या. सिमेंट-खडीचा ढीग डोंगरासारखा झाला होता. त्याखाली अडकलेल्यांची स्थिती न बघवणारी होती. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्घटनेची बातमी कळताच कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक, मंडळातील तरुण, फायर ब्रिगेडचे जवान, पोलिस सगळेच एकत्र येऊन जीव वाचविण्यासाठी धडपड करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT