kolhapur traders 
महाराष्ट्र

'पुण्याला एक न्याय अन् आम्हांला दुसरा', हे बरं नव्हं!

Siddharth Latkar

कोल्हापूर : आमच्या जिल्ह्याचा काेराेनाचा पाॅझिटिव्हिटीचा दर हा पाच टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे आम्हांला पुण्याप्रमाणे दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी काेल्हापूरच्या व्यापारी kolhapur traders करु लागले आहेत. दुकानांची वेळ वाढवून न दिल्यास पुन्हा आंदाेलन छेडू असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांनी रविवारी पुणे जिल्ह्यातील दुकाने shops रात्री आठ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास संमती दिली. पुणे महापालिकेने देखील सकारात्मक निर्णय घेत व्यावसायिकांना दिलासा दिला.

या निर्णयाप्रमाणेच आमच्या जिल्ह्यात दुकानं सुरु ठेवण्यासाठी रात्री आठची वेळ करावी अशी मागणी काेल्हापूरातील व्यापारी करु लागले आहेत. रविवारी सकाळी पुण्यातील व्यापा-यांनी त्यांच्या दुकानांच्या चाव्या पाेलिसांच्या हवाली केल्या. त्यांनी एक प्रकारे असहकार आंदाेलन केले. त्यानंतर दुपारी पुणे जिल्ह्यात दुकाने सुरु ठेवण्यासाठी वाढीव वेळ मिळाली.

काेल्हापूर जिल्ह्यात देखील काेविड १९ ची रुग्ण संख्या कमी हाेऊ लागली आहे. त्यामुळे येथील पॉझिटिव्हिटीचा दर देखील पाच टक्क्यांपर्यंत आला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात रात्री आठ वाजेपर्यंत दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, अन्यथा आम्ही पुन्हा असहकार आंदाेलन पुकारु असा इशारा व्यापा-यांनी दिला आहे. दरम्यान या मागणीसाठी व्यापारी संघटना जिल्हाधिका-यांना भेटण्यास जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT