Kolhapur News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News : सीमाभागात ऊस आंदोलन चिघळलं, ऊस परिषदेनंतर शेतकरी आक्रमक

Kolhapur Farmer Protest : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत काल २२वी ऊस परिषद पार पडली. ही परिषद संपल्यानंतर आंदोलन सुरू झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News :

दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत काल २२वी ऊस परिषद पार पडली. ही परिषद संपल्यानंतर आंदोलन सुरू झालं आहे.

येत्या ३ दिवसात कारखानदारांनी निर्णय घ्यावा. अन्यथा दिवाळीनंतर आक्रमक आंदोलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. सीमाभागात ऊस आंदोलन चिघळलं आहे. सीमाभागातून महाराष्ट्रात येणारे ट्रॅक्टर पेटवले आहेत. कारदगा परिसरात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. (Latest Marathi News)

२२व्या ऊस परिषदेतील ठराव

  • उस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्यात एफआरपी देण्याची केलेली कायद्यातील बेकायदेशीर दुरूस्ती मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय झालेला असतानाही सरकारने अद्याप शासन निर्णय केला नाही. तो शासन निर्णय तातडीने करण्यात यावा.

  • शेतीपंपाचे होणारे भारनियमन त्वरीत रद्द करून शेतीपंपाला विनाकपात दिवसा १२ तास वीज देण्यात यावी. तसेच प्रलंबित वीज पंपाचे कनेक्शन ताबडतोब देण्यात यावे. सदरची वीज हॉर्स पॉवरची सक्ती न करता मीटर रिडींगप्रमाणे द्यावे. राज्य सरकारच्या जलसंपदा प्राधिकरणाने कृषी सिंचनाच्या पाणीपट्टीचे दसपट वाढवलेला कर तातडीने मागे घेऊन पुर्ववत करावेत.

  • यंदा पावसाचे प्रमाण अत्यत्प आहे, संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे. राज्य सरकारने केवळ ४० तालुक्याला दष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाचे निकष बदलून सर्कलनिहाय ज्या ज्या सर्कलमध्ये खरीपाचे पीक वाया गेलेले आहे. तो भाग दुष्काळग्रस्त म्हणून संपूर्ण महाराष्ट्र जाहीर करावा.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • गतवर्षी तुटलेल्या ऊसाची एफआरपी पूर्णपणे देऊन अधिक ४०० रूपये तातडीने देण्यात यावेत. साखर आयुक्तांच्या नियंत्रणाखाली राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे काटे तातडीने ऑनलाईन करून एकाच सिस्टिमधील सॉफ्टवेअरमध्ये काटे बसवावेत.

  • राज्यातील ऊस तोडणी मुकादमांनी ऊस वाहतूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेला आहे. ते पैसे वसूल करण्यासाठी स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेच्या माध्यमातून आमचा लढा सुरू आहे. ज्या मुकादमांनी फसवले आहे, त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून ऊस वाहतूकदारांचे पैसे वसूल करून द्यावेत.

  • मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला स्वाभिमानीचा पूर्ण पाठिंबा असून केंद्र व राज्य सरकारने तातडीने मराठा समाजाला अरक्षण द्यावे. तसेच धनगर, लिंगायत समाजाला त्यांच्या मागणीनुसार आरक्षण द्यावे.

  • चालू गळीत हंगामासाठी एकरकमी 3500 रूपये प्रतिटन पहिली उचल म्हणून देण्यात यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT