बीड : बीड जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली होती. अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यात आतापासून दुष्काळाची दाहकता जाणवायला लागली आहे.(Beed) जिल्ह्यातून वाहत असलेल्या नद्या तसेच तलाव कोरडे पडले आहेत. यामुळे आल्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. (Latest Marathi News)
बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता भयान होत चालली आहे. जिल्ह्यातील नदी, तलाव कोरडे ठाक पडले असून पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. तर माजलगाव तालुक्यासह बीड शहराला पाणीपुरवठा करणारे माजलगाव धरण देखील अवघ्या १० टक्क्यांवर आहे. नदी, तलावात पाणी नसल्याने विहीर व ट्यूबवेलचे पाण्याचे जहीर देखील कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये बीड शहराला देखील पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. उन्हाळ्यात ही समस्या अधिक बिकट होण्याचे चिन्ह आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
दुष्काळ सदृश्य चित्र असताना सरकार अन शासनाने बीड जिल्ह्यातील अकरापैकी अवघ्या ३ तालुक्यातच दुष्काळ जाहीर केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या संकटात सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.