kolhapur news  Saam tv
महाराष्ट्र

१५ तरुणींवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून द्यायचा धमक्या, नराधमाच्या कृत्याने कोल्हापुरात खळबळ

kolhapur shocking news : अमरावतीनंतर आता कोल्हापुरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संशयित नराधम तरण हा तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार करत असल्याचे उघड झाले.

Vishal Gangurde

अमरावतीनंतर कोल्हापुरात घडला धक्कादायक प्रकार

एका तरुणाने १५ पेक्षा अधिक तरुणींना ओढले प्रेमाच्या जाळ्यात

तरुणाच्या कृत्याने कोल्हापुरात खळबळ

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही

अमरावतीचं अयान प्रकरण ताजं असताना कोल्हापुरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पुलाची शिरोली परिसरात एका तरुणाने सुमारे 15 पेक्षा अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार करत ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयिताला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे घडलेल्या या प्रकाराने समाजमन हादरले आहे. 20 वर्षीय तरुणीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हा गुन्हा हातकणंगले पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी शाहीद समीर सनदी या 22 वर्षीय संशयिताला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित सोशल मीडियाच्या माध्यमातून 18 ते 22 वयोगटातील तरुणींशी संपर्क साधत होता. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लॉजवर बोलावून अत्याचार करत त्यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओंचे चित्रीकरण करत होता. यानंतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. शिरोली, हुपरी, हातकणंगलेसह परिसरातील अनेक गावांतील तरुणी या जाळ्यात अडकल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण असून, पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आमचे लक्ष राहणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने संताजी बाबा घोरपडे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT