Kolhapur Saam
महाराष्ट्र

Kolhapur: 'गाव सोडून जा, नाहीतर पत्नीवर बलात्कार करायला सांगेन'; मेन्यू कार्डवरून भांडण, चौघांनी दोघांना लोखंडी रॉडनं फोडलं

Waiters assaulted in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माले येथे चौघांनी दोघांनी बेदम मारहाण केली आहे. तसेच धमकीही दिली आहे.

Bhagyashree Kamble

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

पुण्यानंतर आता कोल्हापुरात मारहाणीची घटना घडली आहे. एका वादातून २ वेटरला चौघांनी बेदम मारहाण केली आहे. एवढंच नाही तर, डोक्याला पिस्तुल लावून 'गाव सोडून जा, नाहीतर पत्नीवर बलात्कार करायला सांगेन', अशी धमकीही दिली. जखमी २ वेटरला उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माले येथे बाबा हॉटेल आणि सावली हॉटेल शेजारी शेजारी आहेत. १७ मार्चला दुपारी तीन वाजता बाबा हॉटेल नजीक असलेल्या पानटपरीवर अभिषेक छत्री भोपारी आणि जितूकुमार हे दोघे थांबले होते. संशयित आरोपी मनोज कांदे याने बाबा हॉटेलमध्ये दोघांना बोलावून घेतले.

हॉटेलमध्ये बोलावून घेतल्यानंतर जितूकुमार हॉटेलचे मेन्यू कार्ड पाहत उभे होते. हॉटेलचे मेन्यू कार्ड का पाहता म्हणून संशयित आरोपी मोहम्मद कुरेशी, प्रवीण पाटील आणि मनोज कांदे यांनी अभिषेक आणि जितूकुमारला बेदम मारहाण केली. काठीने आणि लोखंडी रॉडने पाठीवर, पायावर मारहाण करून जखमी केले. वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच संशयित आरोपी टिपू सुलतान खलिफा याने अभिषेक याच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याला दारू पाजली. नंतर त्याचा व्हिडिओही काढला. तसेच अभिषेकला धमकीही दिली. 'तू आणि तुझी बायको उद्याच्या उद्या निघून जा . नाहीतर तुझ्या बायकोवर बलात्कार करायला सांगेन', अशी धमकी दिली.

या घटनेनंतर दोघांनी हातकणंगले पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी संशयित आरोपी टिपूसुलतान खतीब, मोहम्मद कुरेशी , प्रवीण नाथा पाटील , मनोज संजय कांदे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दोघा जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT