नाद करा पण कोल्हापूरकरांचा कुठं? असं वारंवार म्हटलं जातं...असाच एक प्रकार कोल्हापूरकरांच्या बाबतीत घडलाय.. कोल्हापुरातील नागरिकांनी फॅन्सी नंबर प्लेटसाठी एक दोन नव्हे तर तब्बल १९ कोटी रुपये मोजले आहेत. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
हौसेला मोल नसतं असं म्हणतात, त्यात कोल्हापूरकरांची हौस ही जगावेगळी...आपल्या दारात उभ्या असलेल्या वाहनांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कोल्हापूरकरांनी 2026 मध्ये पसंतीच्या फॅन्सी नंबरसाठी थोडेथोडके नव्हेत तर तब्बल 19 कोटी रुपये खर्च केलेत..हा राज्यातला सर्वाधिक आकडा आहे.
2026 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 18 हजार 600 नागरिकांनी आपल्या वाहनांसाठी आकर्षक आणि पसंतीचे फॅन्सी नंबर खरेदी केलेत. यातून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल 19 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला. 6666,7777, 1111, 2222 आणि 4747 यांसारख्या क्रमांकांना नागरिकांची सर्वाधिक पसंती आहे. अनेकजण आधी आवडीचा नंबर निश्चित करतात आणि मग गाडी खरेदी करतात.
विशेष म्हणजे, या फॅन्सी नंबरची क्रेझ इतकी आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील 'प्रयाग चिखली' हे गावच आता फॅन्सी नंबरंचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलयं. निव्वळ 50 लाख रुपयांपर्यंतची महागडी चारचाकी वाहन नव्हेत तर लहान-मोठ्या दुचाकींवरही आकर्षक नंबर पाहायला मिळतात.
यामुळे गावातील एखाद्या वाहनाचा नंबर पाहूनच ते वाहन कोणत्या कुटुंबाचं आहे, हे ग्रामस्थ सहज ओळखतात. मात्र कोल्हापूरकरांनी 19 कोटी फॅन्सी नंबर प्लेटसाठी खर्च केलेला असला तरी या 19 कोटीत किती गाड्या आल्या असत्या.
मर्सिडीज-बेंझ GLA मॉडेलच्या 51 लाख 80 हजाराच्या 36 गाड्या येतील. साडेसात कोटींच्या रुपयांच्या 2 रोल्स-रॉयस गाड्या येतील. रोल्स-रॉयस फँटम 9 कोटींपर्यंतच्या 2 गाड्या येतील. लँड रोव्हर डिफेंडर टॉप मॉडेलच्या 2.62 कोटींच्या 7 गाड्या आल्या असत्या...
एकूणच काय तर कोल्हापूरकरांचा नादच खुळा. मात्र एकीकडे राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना फक्त हौसेसाठी 19 कोटींचा खर्च करणं कितपत योग्य असाही प्रश्न पडतो. जिथे केवळ काही हजारांसाठी शेतकरी गळफास लावून घेतो तिथे कोट्यवधींच्या फॅन्सी नंबर प्लेटची हौस खरचं गरजेची आहे का?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.