Political leaders during discussions amid speculation of a Congress–Shinde Sena alliance in Kolhapur civic politics. saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Politics: कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना साथ साथ? कोल्हापूरात पडद्यामागे काय घडतयं?

Congress–Shinde Sena Alliance In Kolhapur: कोल्हापुरात महापालिकेत महापौर पदावरून महायुतीत सुरु असणाऱ्या अंतर्गत वादात आता काँग्रेसनं उडी घेतलीय. काँग्रेसनं थेट शिंदेसेनेसोबत युतीचे संकेत दिलेत.त्यामुळे कोल्हापुरात खरचं शिंदेसेना आणि काँग्रेसची युती होणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar
  • कोल्हापूर महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच

  • महापौर पदावरून महायुतीत अंतर्गत वाद

  • काँग्रेसकडून शिंदेसेनेला युतीचे संकेत

कोल्हापूरची गादी आणि तिथलं राजकारण नेहमीच अनपेक्षित वळणं घेत असतं.. महापालिका निवडणुकीत महायुतीने कोल्हापूरात 45 जागांसह बहुमताचा आकडा गाठला असला, तरी सत्तास्थापनेचा पेच सुटण्याऐवजी अधिक गडद झालाय. आणि याला कारण ठरलयं. काँग्रेस - शिंदेसेनेच्या युतीवर सतेज पाटील यांनी केलेलं सूचक विधान.

एकीकडे महापौर पदासाठी कोल्हापुरात शिंदेसेना आणि भाजपात दावे प्रतिदावे सुरु असताना दुसरीकडे सतेज पाटलांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय. त्यामुळे कोल्हापुराच्या राजकीय आखाड्यात सत्तेसाठी कशी गोळीबेरीज होऊ शकते पाहूयात. कोल्हापूरात भाजपला 26, शिंदेसेनेला 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 अशा महायुतीला एकूण 45 जागा मिळाल्यात. तर दुसरीकडे काँग्रेसला 34 तर ठाकरेसेनेला 1 अशा 35 जागा महाविकास आघाडीला मिळाल्यात. मात्र काँग्रेसचे 34 आणि शिंदेंचे 15 नगरसेवक एकत्र आल्यास कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेसेनेला सत्ता स्थापन करणे शक्य आहे.

राज्यात मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून आधीच भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरु आहे. अशातच भाजपनं शिंदेसेनेला सत्तेत डावलल्यास राज्यात वेगवेगळ्या महापालिकांमध्ये शिंदेंसमोर भाजपची कोंडी करण्यासाठी इतर पक्षांसोबतच्या हातमिळवणीचा पर्याय आहे. मात्र शिंदे कोल्हापुरात खरचं काँग्रेससोबत युती करणार का? शिंदेंसेनेची नाराजी भाजप कशी दूर करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत; CM फडणवीसांचं झ्युरिचमध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य

आई मला वाचव, श्वास घेता येत नाहीये; कारमध्ये वाढदिवसाची पार्टी करताना अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

बालेकिल्ला शाबूत, राज्यात शिंदेसेनेची पिछेहाट; अकार्यक्षम मंत्र्यांना 'डच्चू' मिळणार?

Bermuda Triangle: वसईजवळील समुद्रात 'बर्म्युडा ट्रॅंगल'? पालघर जिल्ह्याला भूकंपाचा धोका? मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम?

SCROLL FOR NEXT