Two accused arrested in Kolhapur for duping a युवक of ₹1.82 lakh in a fake marriage scam. saam tv
महाराष्ट्र

कोल्हापुरातील धक्कादायक घटना! लग्नाच्या जाळ्यात अडकला तरुण; दोन एजंटने लावला लाखोंचा गंडा

Kolhapur Marriage Scam Case Details: कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात लग्न लावून देण्याच्या आमिषाने तरुणाची 1.82 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.

Omkar Sonawane

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात लग्न लावून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची तब्बल 1 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन एजंटांनी भावनिक जाळ्यात अडकवून ही लूट केल्याचं समोर आलं असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथील प्रवीण अतिग्रे या तरुणाला लग्न जमवून देतो असं सांगत आरोपी पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले यांनी संपर्क साधला. एका मुलीचा फोटो दाखवून लग्न ठरल्याचा बनाव करण्यात आला. यानंतर आरोपींनी वेगवेगळी कारणं देत पैशांची मागणी सुरू केली. मुलीचे वडील नसल्याने तिच्या नातेवाईकांना पैसे द्यावे लागतील, असा भावनिक आधार घेत सुरुवातीला मोठी रक्कम उकळण्यात आली.

त्यानंतर मुलीच्या मामाला पैशांची गरज असल्याचं सांगत पुन्हा पैसे घेतले. इतकंच नाही तर दागिने सोडवण्यासाठी 15 हजार रुपये आणि लग्नाच्या बस्त्यासाठीही खर्च प्रवीणकडूनच करून घेण्यात आला. अशा प्रकारे एकूण 1 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. काही दिवसांनी मुलीने लग्नास नकार दिल्याचं सांगत आरोपींनी हात झटकले. त्यामुळे संशय आल्याने प्रवीण अतिग्रे यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून या टोळीने आणखी किती जणांना गंडा घातला आहे, याचा तपास सुरू आहे. लग्नाच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT