कोल्हापूर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय झाल्यास हिमालयात निघून जाईल असे वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजकारण सोडून हिमालयात जाण्याची तारीख त्यांनी सांगावी असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. मिटकरी म्हणाले की, मीही त्यावेळेस शब्द दिला होता. की, मी पाटील यांच्यासोबत टाळ, मंजिरा आणि रुद्राक्ष माळ हे साहित्य घेऊन हिमालयात त्यांना सोडण्यासाठी जाईल. चंद्रकांत पाटील हे वैफल्यग्रस्त झाले असून ते या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असल्याची बोचरी टीका मिटकरी यांनी केली आहे..
कोल्हापूरची पोटनिवडणुक ही भाजप आणि महाविकास आघाडीसाठी अटी-तटीची मानली जात होती. या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारणातून सन्यास घेईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याचीच आठवण करून देत राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हरिद्वारपर्यंत थ्री टायर एसी एक्सप्रेसचे तिकिट काढले असून हे मोफत तिकीट पोस्टाने चंद्रकांत पाटील यांना पाठवणार आहेत. दादा दिलेला शब्द पाळतील अशी आशा असल्याचं राजापूरकर म्हणाले.
कोल्हापूर उत्तर विधानसभेतील जागा जिंकल्याबद्दल मविआच्या जयश्री ताई जाधव यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच विकासाभिमुख राजकारणासाठी मतदान केल्याबद्दल मतदारांचे खूप खूप आभार मानतो. महाविकास आघाडी एकजूट होऊन महाराष्ट्राचा शाश्वत विकास करत आहे आणि त्याला लोकांचा पाठिंबा आहे, हे आजच्या निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले. महाराष्ट्र आणि महाविकास आघाडीसाठी एकत्रितपणे काम केल्याबद्दल मी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
कोल्हापूर: आम्ही एकट्याने ७७ हजार मते मिळवली, विरोधकांच्या तोंडाला फेस आणला आहे. शेवटपर्यंत अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. आम्ही या निकालाचे विश्लेषण करु, अशी प्रतिक्रीया चंद्रकांत पाटील यांनी दिली. हिंदुत्व आमचा अजेंडा नाही, हिंदुत्व आमचा श्वास आहे. त्यामुळे आम्ही हिंदुत्वावरच निवडणूक लढवली आहे असंही ते म्हणालेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत वियय झाला आहे. याबाब कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी "हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या एकजुटीचा विजय आहे" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोबतच साम दाम दंड भेद नीतीचा वापर करून मतदारांनाही धमकावणाऱ्या भाजपला राज्यातील जनतेने या निकालातून सणसणीत चपराक लगावली आहे." असं ट्विट करत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत वियय झाला आहे. यावर राष्ट्रवादीचे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खोटक टोला लगावला आहे. आव्हाडांनी एक मीम शेयर केलं आहे, त्यात चंद्रकांत पाटील हे हिमालयात बसवलेले दिसतायत.
नेमकं काय आहे प्रकरण?
“चंद्रकांत पाटील म्हणाले की, जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले. ते तिथे निवडून आले नसते. मात्र मी आज मी एक आव्हान देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षाला टोला लगावला होता.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत वियय झाला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विजयी जयश्री जाधव यांचं अभिनंदन करत भाजपला टोला लगावला आहे. ढोंगी व स्वार्थी राजकारणाला जनतेने कोल्हापूरमध्ये 'उत्तर' दिलं असं रोहित पवार म्हणाले आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत वियय झाला आहे. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्या भावूक झाल्या होत्या. अण्णांनी (दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव) पेरलं ते उगवलं अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेत ही अण्णांची हक्काची पाच वर्षे होती, पण भाजपने पोटनिवडणुक लावली. चंद्रकांत पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय झाला आहे. जयश्री जाधव यांना ९२०१२ एवढी मतं पडली आहेत. त्यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांचा पराभव केलाय.
भवानी मंडप, खासबाग, मिरजकर तीकटी, वरुनतीर्थ 2 बूथ येथील मतदान
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 3529
सत्यजीत कदम, भाजप: 3226
फेरी लीड 303
एकूण लीड 15 हजार 525
( 23 हजार 705 मते मोजणी बाकी )
संभाजी नगर, पद्माला, मंगळवार पेठ 9 येथील मतदान
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 4366
सत्यजीत कदम, भाजप: 3074
ही फेरी लीड: 1292
एकूण लीड: 15 हजार 432
फिरंगाई 6 बूथ, गंजी माळ 7 बूथ येथील मतदान
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 3259
सत्यजीत कदम, भाजप: 2974
ही फेरी लीड: 285
एकूण लीड: 14 हजार 140
याठिकाणी 1 ईव्हीएम मशीन बंद आहे. त्यासाठी व्हीव्हीपॅट (Voter-verified paper audit trail) मशीनवरील मतांची मोजणी सुरू केली आहे.
मिराबाग, संध्यामठ, फिरांगाई 6 बूथ येथून मतदान:
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 3948
सत्यजीत कदम, भाजप: 3189
ही फेरी लीड: 769
एकूण लीड: 13855
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरु आहे. याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला टोला लगावला आहे. कोल्हापूर समतेची आणि प्रबोधनाची भूमी असे म्हणत धार्मिक ध्रुवीकरणाला मतदारांनी नकारलं असं थोरात म्हणाले आहेत. तसेच कोल्हापूरचा विचार हा समतेचा, प्रबोधनाचा असू कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांचे, महाराणी ताराबाईंचे आहे असं ट्विट थोरात यांनी केलंय.
17 व्या फेरीत मतदान
गांगावेश, बाबुजमाल 4 बूथ, रंकाळा वेश, उत्तरेश्वर पेठ, दुधाळी येथील मतदान
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 2795
सत्यजीत कदम, भाजप: 3488
ही फेरी लीड वजा: 693
एकूण लीड: 13096
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरु आहे. यामुळे आता जाधव कुटुंबातील वातावरण आता भावूक झालं आहे. कॉंग्रेस आमदार स्व. चंद्रकांत जाधव यांची आठवण प्रत्येक जण काढत आहे
16 व्या फेरीतील मतदान
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 3638
सत्यजीत कदम, भाजप: 3847
फेरी लीड 209 (भाजप लीड)
एकूण लीड : 13789 (काँग्रेस आघाडी)
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 58351
सत्यजीत कदम, भाजप: 44353
एकूण आघाडी: 13998
अकबर मोहला, शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महापालिका परिसर येथील मतदान
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 4386
सत्यजीत कदम, भाजप: 2432
ही फेरी लीड: 1964
एकूण लीड: 11179
राजारामपुरी, उद्यमनगर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, रविवार पेठ येथील मतदान
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 3946
सत्यजीत कदम, भाजप: 2908
सायिक्स एक्स्टेन्शन, टाकाला या बूथवरील मतदान
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 2870
सत्यजीत कदम, भाजप: 2756
ही फेरी लीड: 114
एकूण लीड: 8187
ताराबाई पार्क 6 बूथ, शाहूपुरी पाच बंगला येथील मतदान
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 2868
सत्यजीत कदम, भाजप: 3794
ही फेरी लीड वजा: 926
एकूण लीड: 8073
ताराबाई पार्क बूथ, नागाला पार्क यांवरील मतदान:
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 2744
सत्यजीत कदम, भाजप: 2937
ही फेरी लीड वजा: 193
एकूण आघाडी: 8959
विचारेमाल 2 बूथ, सदर बझार 5 बूथ, ताराराणी चौक, रुईकर कॉलनी 4 बूथ यांवरील मतदान:
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 3632
सत्यजीत कदम, भाजप: 2431
7 व्या फेरीतील आघाडी: 1201
एकूण आघाडी: 9676
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 31 हजार 12 मतं
सत्यजीत कदम, भाजप: 21 हजार 336 मतं
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 4689 मतं
सत्यजीत कदम, भाजप: 2972 मतं
फेरी लीड : 1717 (काँग्रेस लीड)
एकूण लीड : 8475
जयश्री जाधव, महाविकास आघाडी: 27380 मतं
सत्यजीत कदम, भाजप: 18905 मतं
पाचव्या फेरीतील कदमवाडी प्रभागाची मोजणी पूर्ण झाली आहे, तर जाधववाडी भोसलेवाडी भागातील मतमोजणी सुरु आहे. यात जयश्री जाधव यांना 3673 मतं तर सत्यजीत कदम यांना 4198 मतं मिळाली आहेत. कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी भागात सत्यजीत कदम यांना फक्त 653 मतांचे लीड मिळाले आहे.
महाविकास आघाडी - जयश्री जाधव 22681 मतं
भाजप - सत्यजीत कदम 15933 मतं
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी करूणा मुंडे-शर्मा यांनी केली आहे. या निवडणुकीत आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार करत आपण या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा करुणा मुंडे यांनी केली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. यासाठी मतमोजणी सुरु आहेत. मात्र निकालाआधीच बावड्यात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टर्स झळकले आहेत. यात त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना 15299 मतं तर भाजपचे सत्यजीत कदम 7798 मतं मिळाली आहेत.
जयश्री जाधव 5515 मतं
सत्यजीत कदम 2513 मतं
लीड 3002
एकूण लीड 5139
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून चर्चेत आलेल्या करुणा शर्मा-मुंडे यांनीही उमेदवारी अर्ज भरून ही निवडणूक रंगतदार केलीय. शिवशक्ती सेनेच्या तिकीटावर त्या निवडणूक लढवत आहेत. १३ कोटी जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची माझी इच्छा आहे. महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. सध्या त्या मतमोजणी केंद्रात पोहोचल्या आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. यासाठी पहिल्या फेरीसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात कॉंग्रेसकडून लढणाऱ्या जयश्री जाधव सध्या आघाडीवर आहेत. सध्या जयश्री जाधव 4856 मतं, तर भाजपचे सत्यजीत कदम 2719 मतं मिळाली आहेत. तर जयश्री जाधव या 2137 मतांनी आघाडीवर आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. यासाठी पहिल्या फेरीसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे या जागेची पोटनिवडणूक झाली . या पोटनिवडणुकीत एकूण 15 उमेदवारांनी नशीब आजमावले असले तरी मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. काँग्रेसकडून दिवंगत आमदार यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून सत्यजित कदम उमेदवार आहेत. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.