Kolhapur Wall Collapse News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Wall Collapse News : कोल्हापुरात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, दुसऱ्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु

Kolhapur News : शहरातील केशवराव भोसले आणि खासबाग मैदान यामध्ये असणारी दगडी भिंत आज अचानक कोसळली.

साम टिव्ही ब्युरो

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये सततच्या पावसामुळे  (Heavy Rain) एक दगडी भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक महिला जखमी असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. शहरातील केशवराव भोसले आणि खासबाग मैदान यामध्ये असणारी दगडी भिंत आज अचानक कोसळली.

केशव भोसले इथे एक कार्यक्रम सुरू होता. यावेळी दोन महिला या भिंतीजवळ शौचालयास गेल्या होत्या. यावेळी अचानक खास बाग कुस्ती मैदानाच्या भिंतीचा काही भाग त्यांच्या अंगावर कोसळला आणि या दोन्ही महिला मातीच्या ढिगार्‍यात अडकल्या होत्या. (Latest Marathi News)

मात्र या महिलांसोबत असणाऱ्या मुलीने घडलेली घटना स्थानिक नागरिकांना सांगितली. त्यानंतर स्थानिकांनी आणि महापालिका प्रशासन, अग्निशामन दलाच्या जवानांनी ढिगार्‍यात अडकलेल्या दोन्ही महिलांना बाहेर काढलं.

छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दोन्ही महिलांवर उपचार सुरू होते. मात्र अश्विनी यादव (वय ५९) या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर दुसरी महिला संध्या तेली यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT