Sambhaji Raje Chhatrapati On Vishalgad Encroachment Saam Tv
महाराष्ट्र

Vishalgad Encroachment: सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत गडावरून हलणार नाही, संभाजी राजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा

Sambhaji Raje Chhatrapati On Vishalgad Encroachment: शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने जात असताना काही अज्ञातांनी स्थानिकांवर हल्ला केला. त्यांनी घरांवर हल्ला करत स्थानिकांना मारहाण केली. तसंच घरांची आणि वाहनांची तोडफोड देखील केली.

Priya More

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती आक्रमक झाले आहे. त्यांनी 'चलो विशाळगडचा नारा' दिला होता. त्यानुसार ते आज शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडावर पोहचले. शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने जात असताना काही अज्ञातांनी स्थानिकांवर हल्ला केला. त्यांच्या दगडफेक केली, घरांची तोडफोड केली तसंच वाहनांची देखील तोडफोड केली. या दगडफेकीमध्ये अनेक गावकरी जखमी झाले आहेत. यावेळी या अतिक्रमण मोहिमेला हिंसक वळण आले. या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.

संभाजी राजे छत्रपतींनी चलो विशाळगडचा नारा दिल्यानंतर हजारो शिवभक्त आज विशाळगडाच्या पायथ्याला जमा झाले होते. हातात भगवे ध्वज आणि जय शिवाजी जय भवानीच्या जयघोष करत हजारो शिवभक्त विशाळगडच्या दिशेने जात असतानाच काही अज्ञातांनी विशाळगडच्या पायथ्याला असणाऱ्या काही गावांमध्ये धुडगूस घातला. या जमावाने काही घरांना लक्ष करत घर पेटवून दिली. तर काही घरातली संसारउपयोगी साहित्य रस्त्यावर काढून जाळून टाकली. त्याचसोबत विशाळगडाच्या रस्त्याला असणारी अनेक वाहनांची या जमावाने तोडफोड केली आणि ती पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

या जमावाने अनेक घरांवर तुफान दगडफेक करत स्थानिक नागरिकांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये अनेक गावकरी जखमी झाले. याच परिसरातील काही घर पेटवून देत असताना या घरातले सिलेंडरचे स्फोट झाल्याच्या घटना घडल्या. जमावाने जोरदार हल्ला चढवल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी देखील या जमावावर लाठीचार्ज करत या जमावाला पांघवण्याचा प्रयत्न केला.

अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजी राजे छत्रपती यावेळी काही निवडक कार्यकर्त्यांना घेऊन विशाळगडाच्या दिशेने गेले आहे. 'जोपर्यंत राज्य शासन या अतिक्रमणासंदर्भात ठोस निर्णय घेत नाही. तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नाही.' असा आक्रमक पवित्रा संभाजी राजे यांनी घेतला आहे. आता शासन यासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

Nandurbar Accident : धुळे- सुरत महामार्गावर दोन भीषण अपघात; कोंडाईबारी घाटात वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT