Kolhapur Crime News , Ruikar Colony, Police saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : रुईकर कॉलनीतील बंगल्यात दराेडा, 20 ताेळे साेन्यासह राेकड लूटली; काेल्हापूर पोलीसांचा तपास सुरु

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूरातील रुईकर कॉलनी (ruikar colony kolhapur) परिसरातील एका बंगल्यात दराेडा पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बंगल्यात तब्बल तीन तास दराेडेखाेरांचा वावर होता असे सीसीटीव्हीच्या माध्यमातून निदर्शनास येत आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

ही घटना काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात दरोडेखोरांनी रुईकर कॉलनी परिसरात असणाऱ्या एका बंगल्यात प्रवेश करत सुमारे वीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 हजार रुपयांची रोकड लूटली. याबाबतची तक्रार सुरज सुतार यांनी पाेलिसांत दिली.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार निरंजन वायचळ यांच्या बंगल्यात सुरज हिराप्पा सुतार हे भाड्याने राहतात. सुरज सुतार हे पत्नी, मुलगी आणि भाच्यासह बंगल्यातील एका रूममध्ये झोपले होते. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकी घरात प्रवेश केला.

बंगल्यातील एका रूममधील तिजोरीतील साहित्य विस्कटून तिजोरीतील सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजारांची रोकड लंपास केली. तब्बल तीन तास चोरटे या बंगल्यात वावरत होते.

(kolhapur) सकाळी सातच्या सुमारास सुरज सुतार आणि कुटुंबीय उठल्यानंतर त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ शाहूपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याबाबतची माहिती दिली. सध्या पोलीस या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चोट्यांचा शोध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिवाळीपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात मोठे "सर्च ऑपरेशन"

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

जेवणातील 'हे' पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये

Pune Crime: घायवळ प्रकरणानं वाढली सरकारची डोकेदुखी; गुन्हेगारीवर प्रश्न विचारताच भाजप खासदारानं काढला पळ| Video Viral

SCROLL FOR NEXT