Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Corporation : वृक्षांना आता क्यूआर कोड; स्कॅन करताच मिळणार ईत्तमभूत माहिती, कोल्हापुर महापालिकेचा उपक्रम

Kolhapur News : कोल्हापूर महानगर पालिकेच्या हद्दीत ५ लाखांपेक्षा अधिक वृक्षसंपदा आहे. या वृक्ष संपदा मध्ये दुर्मिळ वृक्ष, अतिदुर्मिळ वृक्ष, वारसा वृक्ष, विदेशी वृक्ष, देशीवृक्ष यांसह विविध वृक्षांचा समावेश आहे

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील दुर्मिळ वृक्षांना नेमप्लेट लावण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. विशेष म्हणजे वृक्षांना लावण्यात येत असलेल्या नेम प्लेटवरील क्यूआर कोड देखील देण्यात आलेला आहे. अर्थात हा क्यूआर कोड स्कॅन करताच एका सेकंदात नागरिकांना वृक्षाची ईत्तमभूत माहिती उपलब्ध होत आहे.

सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी अधिक लोकप्रिय झाला आहे. याच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मध्ये दिवसातले सर्वाधिक तास आपण घालवतो, मात्र याचाच उपयोग महापालिकेने करत थेट माहिती नागरिकांना मिळत असल्याने या वृक्षसंपदेचा इतिहास महापालिकेच्या वतीने जणू डिजिटल झाला आहे.

२५० ठिकाणी वृक्ष संपदेचे सर्वेक्षण 
कोल्हापूर महानगर पालिकेच्या हद्दीत ५ लाखांपेक्षा अधिक वृक्षसंपदा आहे. या वृक्ष संपदा मध्ये दुर्मिळ वृक्ष, अतिदुर्मिळ वृक्ष, वारसा वृक्ष, विदेशी वृक्ष, देशीवृक्ष यांसह विविध वृक्षांचा समावेश आहे. या वृक्ष संपदेचे जतन कोल्हापूर महानगरपालिकेचा उद्यान विभाग तर करत आहे. मात्र या अति दुर्मिळ, दुर्मिळ आणि वारसा असणाऱ्या वृक्षांची माहिती अनेक नागरिकांना नाही. त्यामुळे उद्यान विभागाच्या पुढाकारातून २५० पेक्षा अधिक ठिकाणच्या वृक्षसंपदेचे सर्वेक्षण करण्यात आलं. 

क्यूआर स्कॅन करताच मिळतेय सर्व माहिती 

सर्वेक्षण केल्यानंतर सदरच्या वृक्षांची माहिती नागरिकांना सहजरित्या उपलब्ध व्हावी; या उद्देशाने झाडांना नेमप्लेट बसवण्याच काम हाती घेण्यात आले आहे. या नेमप्लेट वर त्या झाडाचं शास्त्रीय नाव, स्थानिक नाव याच्यासह वृक्ष कोणत्या कॅटेगरीत बसतो याचा उल्लेख करत क्यूआर कोड देखील देण्यात आला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करत अनेक नागरिक या वृक्षाची सर्व माहिती घेत आहेत. तसेच माहिती मिळाल्याबद्दल समाधानही व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT