Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Fake Notes : बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात अडकले; सराफासह तिघे पोलिसांच्या ताब्यात

Kolhapur news : कोल्हापुरातील खरी कॉर्नर इथल्या कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेतील एटीएममध्ये २४ सप्टेंबर २०२४ ला ५०० रुपयांच्या ७५ नोटांचा भरणा झाला होता. त्यापैकी ६६ नोटा बनावट असल्याचे बँकेच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आले

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : बनावट नोटा चलनात आणण्यासाठी त्या एटीएम सेंटरच्या डिपॉझिट मशीनमध्ये भरण्याचा प्रयत्न कोल्हापूरात उघडकीस आला आहे. नोटा भरणाऱ्या सराफासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या ८६ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मात्र नोटा कुठून आल्या या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

निखिल सरगर, अमोल पोतदार आणि शिवप्रसाद कदम या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील संशयित अमोल पोतदार हा सराफ व्यावसायिक आहे. बनावट नोटांचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाल्याचे कोल्हापुरात उघडकीस आलेल्या घटनेवरून सिध्द झाले आहे. कोल्हापुरातील खरी कॉर्नर इथल्या कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेतील एटीएममध्ये २४ सप्टेंबर २०२४ ला ५०० रुपयांच्या ७५ नोटांचा भरणा झाला होता. त्यापैकी ६६ नोटा बनावट असल्याचे बँकेच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आले. 

सुरवातीला सराफ सापडला ताब्यात 

याबाबत बँकेतील अधिकारी जोतिबा तिरवीर यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला गुन्ह्याची उकल करण्यास सांगितले. त्यानुसार मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून एटीएम सेंटरमध्ये पैसे भरणार्‍या तसेच बनावट नोटा देणार्‍या संशयितांचा शोध सुरू करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी अमोल पोतदार या सराफाला अटक केली. 

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार निखिल सरगर याने बनावट नोटा दिल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता अमोल पोतदार याच्याकडं सोन्याची चेन बनवण्यासाठी दिली होती. तो कमी टंचाचं सोनं वापरणार असल्यानं पाचशे रुपयांच्या बनावट नोटा दिल्याचं स्पष्ट केलं.

अधिक चौकशीत निखिल सरगर याला कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर इथं राहणारा शिवप्रसाद कदम याने बनावट नोटा दिल्याचे सांगितले. दरम्यान तपासात अमोल पोतदार याच्याकडून पाचशेच्या आणखी २० नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तसेच शिवप्रसाद कदमला देखील अटक करण्यात आली. या तिघांना न्यायालयानं २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आनंदात, मौजमजा करण्यात जाणार या ३ राशींचा दिवस, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, लँडिंगवेळी विमानाचा भाग रनवेला धडकला

Maharashtra Live News Update: वीज पडून 23 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू,वर्ध्यातील घटना

Yavatmal Rain: पैनगंगा नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, यवतमाळ- नांदेडदरम्याची वाहतूक ठप्प, दोन जणांचा मृत्यू

वाहन आणि लायसन्ससाठी आधार अन् मोबाईल अनिवार्य; जाणून घ्या लिंक करण्याची प्रोसेस

SCROLL FOR NEXT