Kolhapur News
Kolhapur News Saamtv
महाराष्ट्र

Kolhapur News: दुर्देवी! नदीवर पोहायला गेले अन् घडला अनर्थ; सहा वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू

Gangappa Pujari

रणजीत माजगावकर, प्रतिनिधी..

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातून एक दुखःद आणि दुर्देवी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरातील नदीत सहा वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा चिमुकला शाळा सुटल्यानंतर पोहायला गेला असता ही दुर्घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, कसबा बावडा परिसरातील नदीत पोहायला गेलेल्या सहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर ही चार लहान मुलं कसबा बावडा परिसरातील नदीत पोहायला गेले होते. यावेळीच एकाचा पोहत असताना बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोन मुले बुडाले होते, अशीही माहिती समोर आली आहे. ज्यामधील एकाचा बुडून मृत्यू तर दुसऱ्याला वाचवण्यात यश आले आहे.

दरम्यान, बुडून मृत्यू झाल्याची आजच्या दिवसातील ही दुसरी घटना घडली आहे. लातुर जिल्ह्यामध्येही अशीच दुर्देवी घटना समोर आली आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील उदगीर येथील बनशेळकी तलावात आईसह दोन मुले बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मनीषा गौतम शिरसाठ या महिलेचा मृतदेह तलावाबाहेर काढला आहे. पण अद्यापही त्या दोन मुलांचा शोध सुरूच आहे. (Kolhapur News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

Today's Marathi News Live : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रशासन मतदानासाठी सज्ज

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

Jharkhand ED Raid News | झारखंडमध्ये ED ची मोठी कारवाई, कोट्यवधींची रोकड जप्त

Success Story: पारंपारिक शेतीला बगल देत युवा शेतक-याने शेवगा शेतीतून कमविला लाखाेंचा नफा

SCROLL FOR NEXT